Mumbai : मुंबईच्या कांदिवाली पुर्व परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.एका प्रियकराने आपल्या प्रेयसील कड्यावरून ढकलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील सिया-केतन हत्याकांडाचा निकाल लागण्यापूर्वीच मुंबईतून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही घटनेत बरेच साम्य आढळले आहे. मात्र मुंबईच्या या घटनेत मुलीनी नाही तर मुलाने आपल्या प्रेमीकेला कड्यावरून ढकलले आहे.ही घटना मुंबईतील कांदिवली पूर्व येथील समता नगर परिसरात घडल्याची माहिती आहे. तर पोलीसांनी अवघ्या २४ तासांतच आरोपीला अटक केली आहे.(Siya-Ketan Case)
केरळ : केरळच्या कन्नूर (Keral Kannur) जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला आणि पालकांना हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक आणि दुःखद घटना समोर आली आहे. ओठाला ...
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्यावेळी दामूवनगरच्या मागे असलेल्या डोंगराळ भागात एका अल्पवयील मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलीसांना मिळाली.समतनगर पोलीसांनी घटना स्थळी धाव घेत, चौकशीला सुरूवात केली आहे. पोलीसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेत, मुलीची ओळख पटवण्यासाठी परिसरातली लोकांशी चौकशी केली. पोलीसांनी हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी आणि तांत्रिक पुराव्यांचा वापर करत मुलीची ओळख उघडकीस आणली. (Mumbai Crime)
मुंबई : उपवास म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी येते ती म्हणजे साबुदाणा खिचडी. मात्र प्रत्येक उपवासाला तीच तीच खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, तर ...
डिलिव्हरी बॉयला अटक
मृत मुलीचे सुरज मारुती नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या माहितीच्या आधारे पोलीस तपासात आरोपीची कथित भूमिका समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रियकराला अटक केली. आरोपी व्यावसायाने एक डिलिव्हरी बॉय आहे. पोलिस सध्या त्याची चौकशी करत असून हत्येचा संपूर्ण कट आणि घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्राथमिक तपासात हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.ही हत्या पूर्वनियोजित होती की रागाच्या भरात घडली याचाही तपास पोलिस करत आहेत.समतनगर पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.तपासपूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील खरा कारण सांगीतला जाईल. मात्र या घटनने संपूर्ण परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झाला आहे.(Crime News)






