मुंबई : आषाढी वारी २०२६ (Ashadhi Wari 2026) मध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वारीदरम्यान मोबाईलची बॅटरी संपण्याची चिंता आता वारकऱ्यांना करावी लागणार नाही. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात सहभागी दिंडींसाठी सौरऊर्जेवर आधारित मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमामुळे वारकऱ्यांना कुटुंबीयांशी सतत संपर्कात राहणे, आवश्यक माहितीची देवाणघेवाण करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मोबाईलचा सहज वापर करणे शक्य होणार आहे. (Ashadhi Wari 2026)
आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari 2026) श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडींमध्ये २५ जुलै २०२६ पर्यंत सोलर मोबाईल चार्जर संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक आणि स्वच्छ ऊर्जेवर आधारित ही सुविधा वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
मुंबई : मुंबईतील बेस्ट (BEST) बस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी कारण अपघात नसून एका बस चालकाने शेवपुरी (Sev Puri) खाण्यासाठी भररस्त्यात बस थांबवल्याचा ...
वारीचा प्रवास अनेक दिवसांचा आणि शेकडो किलोमीटरचा असल्याने मोबाईल चार्जिंग ही वारकऱ्यांसमोरची मोठी अडचण असते. यावर उपाय म्हणून महाऊर्जाने सौरऊर्जेवर चालणारे मोबाईल चार्जर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे पारंपरिक वीजेवरील अवलंबित्व कमी होण्यासोबतच अक्षय ऊर्जेचा प्रभावी वापरही होत आहे. (Ashadhi Wari 2026)
पुणे : लोणावळा-कर्जत घाट विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे (Railway) सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत (Disrupted) ...
महाऊर्जाने वारकऱ्यांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले असून, आध्यात्मिक वारीला आधुनिक तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेची जोड देणारा हा उपक्रम यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण ठरत आहे. (Ashadhi Wari 2026)





