Thursday, July 30, 2026

BMC News : स्कॉर्पिओ गाड्या कुणाला नको, इनोव्हा गाडी कुणाला हवी!

BMC News : स्कॉर्पिओ गाड्या कुणाला नको, इनोव्हा गाडी कुणाला हवी!

सभागृहनेत्यांनी सत्यच सांगून टाकले

विरोधी पक्षनेत्यांचाच खोटेपणाचा बुरखा फाडला

मुंबई : मुंबई महापालिकेतील (BMC) वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांनी स्कॉर्पिओ गाडी ऐवजी इनोव्हा गाड्यांची मागणी केल्याने सत्ताधारी पक्षावर आणि नगरसेवकांवर समाज माध्यमांतून टीका होत आहे. मात्र ही मागणी सत्ताधारी पक्षाची नसून विरोधी पक्ष नेत्या यांनीच ही मागणी सर्वप्रथम केली आहे सांगत सभागृह नेते गणेश खणकर यांनी त्यांच्या खोटेपणाचा बुरखा फाडला. विरोधी पक्षनेत्या या आता पलटी मारत असल्याचे सांगत मी त्यांना होत असलेल्या त्रासाची दखल घेतली. आम्ही त्यांची बाजू मांडली. आम्ही ही त्यांची मागणी लावून धरताना पळ काढली नाही. पण यापुढे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची मागणी तोंडी नाहीतर लेखी लिहून घेणार असे सांगतच या पुढे महापौर (Mayor) आणि आयुक्त वगळता अध्यक्ष आणि अधिकारी यांच्या वाहनांत समानता हवी अशी मागणी केली.

मुंबई महापालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर  उपमहापौर यांच्यासह वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी भाडेतत्वावर अर्थात वेट लीजवर स्कॉर्पिओ गाड्या घेतल्या दिल्या आहेत. या गाड्या विकत घेतल्या नसून हा प्रस्ताव तेव्हा प्रशासनाने आणला होता. त्यानुसार या गाड्या अध्यक्षांच्या सेवेत आहेत. पण या गाडीत चढताना त्रास होतो.. पाठ दुखते अशा तक्रारी खुद्द विरोधी पक्षनेत्यांनी केल्यानंतर या गाड्या बदलून घेण्यात याव्यात अशी सूचना करण्यात आली. त्यांनी नवीन गाडी पाहिजे अशी त्यांची मागणी होती. मात्र आज त्यांनी भूमिका बदलली आहे. त्या आता पळून गेल्या असून त्याच आता आम्हाला माध्यमांच्या समोर जाऊन आम्हाला प्रश्न करत आहेत. यामुळे आमच्यावर टीका होत आहे. पण सभागृहाचा नेता म्हणून आम्ही त्यांच्या मागणीचा विचार करत असून ज्या गाड्या विकत घेतल्या नसून भाडेतत्वावर घेतल्याने त्या बदलून घेण्याचा एवढाच काय तो प्रस्ताव आहे. यामुळे आमच्यावर टीका होत आहे.

पण मी स्वतः या वाहनाचा कमी वापर करतो. सर्वांत कमी वापरणारा मी एकमेव असून रात्रीही मी चर्चगेटला गाडी सोडून लोकलने प्रवास करतो. जेव्हा भेटी आणि बैठका असतात तेव्हाच मी या वाहनाचा वापर करतो. बाकी मी लोकलने प्रवास करणारा आणि बाईकने फिरणारा आहे. पण ज्यांनी २५ वर्षे सत्ता भोगली त्यांनाच आता वाहनाचा त्रास होत आहे असे सभागृह नेता खणकर यांनी स्पष्ट केले.. मात्र, महापौर आणि आयुक्त यांच्यासाठी असलेली वाहने वगळता इतर सर्व मग ते अधिकारी असतील किंवा समित्यांचे अध्यक्ष असतील त्यांना एकच प्रकारचे वाहन उपलब्ध करून देण्यात यावे. दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीत शालेय इमारतीच्या स्वच्छता आणि सुरक्षा या प्रस्तावावर बोलताना काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी स्कॉर्पिओ वाहनाचा मुद्दा छेडण्याचा प्रयत्न केला.यावर स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी यात विरोधी सदस्य सामील असून वेळप्रसंगी तीसुद्धा माहिती देऊ असे सांगत त्यांचे तोंड गप्प केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >