फेर चौकशीसाठी वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ व माजी कुलगुरु प्रा. डॉ. संजय देशमुख यांची महानगरपालिका प्रशासनाकडून नेमणूक
एक महिन्यात समिती सादर करणार अहवाल
मुंबई : चेंबूर (Chembur) येथील झाड दुर्घटनेप्रकरणी फेर चौकशी करण्याची मागणी महापालिका सभागृहात झाल्यानंतर आणि महापौरांनी मागणी केल्यानंतर आता महानगरपालिका प्रशासनाने वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ तथा माजी कुलगुरु प्रा. डॉ. संजय देशमुख यांची एकसदस्यीय समिती म्हणून नेमणूक केली आहे. या त्रयस्थ समितीने एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. चेंबूर परिसरातील डायमंड उद्यानाजवळ एका शाळकरी बसवर ३० जून २०२६ रोजी दुपारी पिंपळाचे जुने आणि मोठे झाड कोसळून (Tree Collapse) ओढवलेल्या दुर्दैवी घटनेत विहान श्रीवास्तव (वय ११ वर्षे) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले. चेंबूर येथील या दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रारंभी समिती गठीत केली होती. या समितीने सादर केलेला सविस्तर अहवाल मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच महानगरपालिका सभेने अमान्य केला होता. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सखोल तपास, सक्त कारवाई व कठोर दंडात्मक शिफारशींचा अभाव असल्याचे नमूद करुन महापौर तसेच महासभेने हा प्रारंभिक अहवाल अमान्य केला. तसेच त्रयस्थ व तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करुन फेरचौकशी करण्याचे निर्देशही दिले होते.
PM Narendra Modi : 'विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही'; अँटी-पेपर लीक कायद्यावर PM मोदींचा इशारा
नवी दिल्ली : सार्वजनिक परीक्षा (Public Examinations) प्रक्रियेत होणारी पेपर लीक (Paper Leak), कॉपी (Copying) आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या ...




