Nitesh Rane : वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे एमआयडीसी स्थापन करा

पालकमंत्री नितेश राणेंचे उद्योगमंत्र्यांना निवेदन; २८ एकर शासकीय जमिनीवर उद्योग केंद्र उभारण्याची मागणी



मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर हक्काचा रोजगार निर्माण करण्यासाठी वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील २८ एकर शासकीय जमिनीवर 'महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ' (MIDC) स्थापन करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी गुरुवारी विधानभवनातील दालनात उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सुपूर्द केले.



सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गसंपन्न असून पर्यटन, कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र, या क्षेत्रांमध्ये प्रगत असला तरी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात अजूनही प्रचंड मोठी क्षमता दडलेली आहे आणि ती पूर्णपणे वापरली गेलेली नाही. वैभववाडीतील नाधवडे परिसराचा विचार केल्यास, तेथे २८ एकर शासकीय जमीन उपलब्ध आहे. तसेच आवश्यक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील औद्योगिक विस्ताराची क्षमता लक्षात घेता, या ठिकाणी नवीन एमआयडीसी विकसित करणे अत्यंत गरजेचे आणि काळाची गरज असल्याचे पालकमंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.



मौजे नाधवडे येथील या शासकीय जागेवर एमआयडीसीची स्थापना झाल्यास परिसरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे. या औद्योगिक केंद्रामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी लाभण्यासह गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील सुशिक्षित आणि कुशल युवकांचे रोजगारासाठी मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये होणारे स्थलांतर रोखण्यासही यामुळे मोठी मदत होईल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले

FDA Action : मुंबईतील नामांकित 'ऑटर्स क्लब'सह ६ आस्थापनांवर 'एफडीए'ची कारवाई

मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांविरुद्ध अन्न व औषध