- शासकीय लाभ १०० टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार
मुंबई : केंद्र सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि गोव्याच्या 'स्वयंपूर्ण गोवा' या यशस्वी उपक्रमांच्या धर्तीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 'स्वयंपूर्ण सिंधुदुर्ग' ही महत्त्वाकांक्षी संकल्पना प्रभावीपणे राबविली जाणार आहे. या योजनेमुळे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ १०० टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार असून, जिल्हा विकासाचे एक नवे प्रारूप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभे राहील, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली. मंत्रालयातील त्यांच्या दालनात या संकल्पनेचे विस्तृत सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री नितेश राणेंचे उद्योगमंत्र्यांना निवेदन; २८ एकर शासकीय जमिनीवर उद्योग केंद्र उभारण्याची मागणी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक ...
'विकसित भारत २०४७' आणि 'विकसित महाराष्ट्र' या ध्येयपूर्तीसाठी शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून 'स्वयंपूर्ण सिंधुदुर्ग' अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये एक जबाबदार अधिकारी नियुक्त केला जाईल. याशिवाय, आधुनिक डिजिटल संवाद व्यवस्था आणि थेट लाभार्थी-केंद्रित अंमलबजावणीची एक मजबूत यंत्रणा गावपातळीवर उभारण्यात येणार आहे. यामुळे प्रशासकीय कामांत गतिशीलता येण्याबरोबरच शासकीय योजनांमधील पारदर्शकता वाढेल आणि प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला. (Nitesh Rane)
मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; १५० कोटींची गुंतवणूक, 'मेक इन इंडिया' अंतर्गत प्रवासी बोटींची निर्मिती मुंबई(Mumbai) : महाराष्ट्रातील ...
डिजिटल ग्रामपंचायती आणि रोजगारनिर्मितीवर भर :
- या नव्या संकल्पनेमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती खऱ्या अर्थाने 'डिजिटल ग्रामपंचायती' म्हणून सक्षम होतील. कागदोपत्री विकास न करता, लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यावर यात भर दिला जाणार आहे. गावातील स्थानिक संसाधनांचा वापर करून तिथेच नवीन रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करणे हे या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य असणार आहे. - मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होत्या. तसेच या प्रकल्पाच्या नियोजनासाठी कैलास सावंत, सचिन सावंत, नितीन पांढरपट्टे आणि सुयोग दीक्षित आदी उपस्थित होते. (Nitesh Rane)




