ब्रिस्टल : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (9 जुलै) ब्रिस्टलच्या काउंटी ग्राउंडवर रंगणार आहे. मालिकेत 0-2 अशी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे.जर का भारतीय संघाचा या सामन्यात पराभव झाला तर संघाला मालिका गमावावी लागेल.या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगीतले जात आहे. (Vaibhav Sooryvanshi)
लॉस एंजेलिस: अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारल्यानंतर, आता बेल्जियमचा संघ पूर्णपणे 'सिरियस मोड'मध्ये आला आहे. शुक्रवारी ...
सलग तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या तिलक वर्माला प्लेइंग -११ मधील त्याचे स्थान धोक्यात असल्याचे सांगीतले जात आहे. त्याच्या जागी टी-20 विश्वचषक 2026 मधील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट संजू सॅमसन याचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजू सॅमसनला या मालिकेत पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याच्या जागी वैभवला संधी देण्यात आली होती.वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने छाप पाडली असली, तरी मोठी खेळी करण्यात तो ही अपयशी ठरला आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास कायम ठेवला आहे.(Ind vs Eng )
लातूर : जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पलटी होऊन २२ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली या प्रकरणात बस चालकाच्या ...
गोलंदाजीतही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मागील सामन्यात महागडा ठरलेल्या वरुण चक्रवर्तीला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळण्याची शक्यता आहे.वॉशिंग्टन सुंदरच्या समावेशामुळे भारताला फिरकी गोलंदाजीसोबतच खालच्या फळीत फलंदाजीसाठी एक अतिरिक्त फलंदाज उपल्बध होणार आहे. दरम्यान, कर्णधार श्रेयस अय्यरवरही मोठी जबाबदारी असणार आहे.मालिका जिवंत ठेवण्यासाठी भारताला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत सर्वोत्तम कामगिरी करण्याची गरज आहे.(Ind vs Eng )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी ७ जणांची समिती मुंबई : भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून राज्यात ...





