Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन पूर्णपणे 'ॲक्शन मोड'वर आले आहे. राज्यभर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच NDRF आणि SDRF यांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. (Government of Maharashtra)


पुणे जिल्ह्यातील मोशी येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून एक जण जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आला आहे. दुर्घटनेच्या वेळी इमारतीत एकूण २३ जण होते. त्यापैकी पाच जण वरच्या मजल्यावरून स्वतः बाहेर पडले, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. उर्वरित नागरिकांच्या शोधासाठी बचावकार्य सुरू आहे. (Government of Maharashtra)



दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी विविध जिल्ह्यांतील परिस्थिती आणि सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. (Government of Maharashtra)


राज्यभर नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, मदत व बचावकार्य, तसेच २४ तास कार्यरत नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शासनाने केले आहे.



मुंबईत सहा दिवसांत विक्रमी पाऊस :


मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत अवघ्या सहा दिवसांत कुलाबा येथे ८८२ मिमी, तर सांताक्रूझ येथे ९८८ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या सुमारे ४२ टक्के इतका आहे. ताशी ५० ते ७५ किमी वेगाचे वारे आणि चार मीटरहून अधिक उंच भरतीमुळे परिस्थिती गंभीर झाली होती. तरीही विविध यंत्रणांनी प्रभावी समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. (Government of Maharashtra)



पालघर, रायगड, ठाणे आणि पुण्यातही प्रशासन सतर्क :


पालघर जिल्ह्यात पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागांना भेट देत मदतकार्याची पाहणी केली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून रायगड, रत्नागिरी आणि इतर जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. ठाण्यातील कळवा पूर्व येथील भास्कर नगर परिसरात डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने घरे धोक्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक उपाययोजना केल्या. त्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. (Government of Maharashtra)



पर्यटनस्थळांवर निर्बंध :


पावसाळ्यातील वाढती पर्यटकांची गर्दी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत. राज्यात नैसर्गिक आपत्तींचा धोका कायम असला तरी शासनाने यंत्रणा सज्ज ठेवल्यामुळे बचावकार्याचा वेग वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Government of Maharashtra)

Comments
Add Comment

Sindhudurg Umed Mall : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'उमेद' मॉलला मंजुरी

- मंत्री नितेश राणे यांची माहिती; गणेशोत्सवाआधी जिल्ह्यातील सर्व रस्ते सुस्थितीत करण्याची पालकमंत्र्यांची

Marathi Bhasha : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलता न आल्यास 'बॅज' निलंबित करणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २० ऑगस्टपासून राज्यभरात अंमलबजावणी मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना

Mumbai University Exam New Rule : लेट लतीफ विद्यार्थ्यांना बसणार दणका; परीक्षेच्या ३० मिनिटे आधी हजेरी बंधनकारक

- मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी नवा नियम मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्न सर्व

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकर यांची सुनबाई झाली 'प्राण्यांची डॉक्टर'; नणंद साराची प्रतिक्रिया चर्चेत

क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. सचिन

Georgis Gor, Devendra Fadnavis : महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवीस!

- अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर यांच्याकडून कौतुक; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डायनॅमिक, एनर्जेटिक आणि कामाची

Sunetra Pawar : पिंपळवंडीतील बालिका अत्याचार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर