Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकर यांची सुनबाई झाली 'प्राण्यांची डॉक्टर'; नणंद साराची प्रतिक्रिया चर्चेत

क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. सचिन यांचा मुलगा आणि युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याच्या पत्नीने, म्हणजेच सानिया चंडोक (Saaniya Chandok) हिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात एक मोठा टप्पा गाठला आहे. सानिया आता अधिकृतपणे एक प्रामाणित 'वेटरनरी टेक्निशियन' बनली आहे. वर्ल्डवाइड व्हेटर्नरी सर्व्हिस (WVS) च्या एबीसी कार्यक्रमांतर्गत तिने हे वैद्यकीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. या यशाची माहिती सानियाने स्वतः सोशल मीडियावर एका खास फोटोसह शेअर केली, ज्यामध्ये ती एका श्‍वानाची वैद्यकीय तपासणी करताना दिसत आहे. तिची ही पोस्ट सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांसोबतच तिची नणंद सारा तेंडुलकर (Saara Tendulkar) हिनेही यावर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.





प्राण्यांबद्दलचे विशेष प्रेम आणि त्यांच्या आरोग्याविषयी वाटणारी आपुलकी यांमुळे सानियाने हे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. या विशेष कोर्सदरम्यान तिने प्राण्यांची प्राथमिक वैद्यकीय देखभाल, आरोग्य तपासणी, रोगनिदान आणि दैनंदिन उपचारांचे सखोल कौशल्य आत्मसात केले आहे. मिळालेल्या या नव्या प्रमाणपत्रामुळे सानियाची पेट-केअर क्षेत्रातील व्यावसायिक पकड अधिक घट्ट झाली आहे.



विशेष म्हणजे सानियासाठी प्राण्यांची सेवा करणे ही केवळ एक आवड नसून तो तिच्या व्यवसायाचाही महत्त्वाचा भाग आहे. मुंबईत ती 'मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपी' नावाचा एक प्रसिद्ध पेट-केअर व्यवसाय चालवते. याद्वारे पाळीव प्राण्यांच्या ग्रूमिंग, स्किनकेअर आणि आरोग्याशी संबंधित विविध आधुनिक सुविधा पुरवल्या जातात. व्यवसायासोबतच प्रत्यक्ष वैद्यकीय कौशल्य मिळवल्यामुळे आता तिच्या या पेट-केअर ब्रँडला अधिक बळ मिळणार आहे.


उल्लेखनीय आहे की, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक ५ मार्च २०२६ रोजी विवाहबंधनात अडकले. मुंबईतील एका भव्य सोहळ्यात पार पडलेल्या या लग्नाला क्रिकेट आणि क्रीडा क्षेत्रासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. लग्नापूर्वीपासूनच सानियाचे तेंडुलकर कुटुंबाशी, विशेषतः नणंद सारा तेंडुलकरशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घट्ट नाते आहे. सानियाच्या या नवीन यशावर साराने व्यक्त केलेला आनंद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Comments
Add Comment

Sindhudurg Umed Mall : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'उमेद' मॉलला मंजुरी

- मंत्री नितेश राणे यांची माहिती; गणेशोत्सवाआधी जिल्ह्यातील सर्व रस्ते सुस्थितीत करण्याची पालकमंत्र्यांची

Marathi Bhasha : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलता न आल्यास 'बॅज' निलंबित करणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २० ऑगस्टपासून राज्यभरात अंमलबजावणी मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना

Mumbai University Exam New Rule : लेट लतीफ विद्यार्थ्यांना बसणार दणका; परीक्षेच्या ३० मिनिटे आधी हजेरी बंधनकारक

- मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी नवा नियम मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्न सर्व

Georgis Gor, Devendra Fadnavis : महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवीस!

- अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर यांच्याकडून कौतुक; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डायनॅमिक, एनर्जेटिक आणि कामाची

Sunetra Pawar : पिंपळवंडीतील बालिका अत्याचार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर

Kishori Pednekar : महापालिका विरोधी पक्षनेत्या गोंधळलेल्या!

- पद टिकवण्यासाठी पेडणेकरांचा केविलवाणा प्रयत्न मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेते