मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत १२.४४ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. संततधार पावसाने धरणातील पाणीसाठा ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईचा पिण्याच्या पाण्याचा साठा अंदाजे ४० दिवसांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर अद्याप सुरु असलेली १० टक्के पाणीकपात बंद होण्याची शक्यता आहे. परंतु जोपर्यंत सातही जलाशय भरत नाहीत तोपर्यंत १० टक्के पाणी कपात सुरूच राहील, असे बीएमसीने स्पष्ट केले आहे. जुलै महिनाअखेरीस पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतरच यावर निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र, अद्यापही काही जिल्ह्यांत पावसाचा धोका ...
गेल्या आठ दिवसांपासून तीही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईला न्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सहा टक्क्यांपर्यंत घटलेल्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे नाशिक जिल्ह्यात येत असून, इगतपुरी येथे मुसळधार पाऊस बरसत आहे. धरण क्षेत्रात असाच पाऊस झाल्यास जलसाठ्यात झपाट्याने वाढ होईल, असा विश्वास पालिकेच्या जल अभियंता विभागाने स्पष्ट केला आहे.(Mumbai)
मुंबई : व्हॉट्सअॅपने मुंबईत आयोजित वार्षिक बिझनेस समिट २०२६मध्ये व्यवसायांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करत ‘मेटा बिजनेस एजंट एआय’ सादर केले. या नव्या ...
तुळशी, मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात घरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत ८ जुलैला पाच लाख ९८ हजार ५८९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू राहिली तर पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होईल आणि मुंबईवरील पाणी कपातीचे संकट दूर होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.(Monsoon Update)





