मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. ६ जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाले असून, रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र, दुरुस्तीचे काम आव्हानात्मक असल्याने काही काळ लागण्याची शक्यता आहे. (Central Railway)
सोलापूर: मराठीतील गाजलेल्या सैराट चित्रपटातील अभिनेता अरबाज शेख यांच्या तक्रारीनंतर सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलशी संलग्न मेडिकलवर अन्न व औषध ...
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, पुणे इंटरसिटी, हुबळी-दादर एक्सप्रेस, हैदराबाद-सीएसएमटी एक्सप्रेस, चेन्नई-सीएसएमटी सुपरफास्ट मेल, इंदूर-दौंड एक्सप्रेस आदी प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय महालक्ष्मी एक्सप्रेस, सातारा-दादर एक्सप्रेस, दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस तसेच विविध तारखांना धावणाऱ्या काही नियमित गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. (Central Railway)
विशेष गाड्यांनाही फटका :
भूस्खलनामुळे अनेक विशेष रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यात सीएसएमटी–गोरखपूर, पुणे–गोरखपूर, पुणे–गाझीपूर सिटी आणि पुणे–हजरत निजामुद्दीन विशेष एक्सप्रेस यांचा समावेश आहे. (Central Railway)
नवी दिल्ली: महादेव ॲप ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुरुवारी एक मोठी कारवाई करत न्यायालयात ११ आरोपपत्रे दाखल केली आहेत. ...
दरम्यान, लोणावळा–कर्जत मार्गावरील तिन्ही रेल्वेमार्ग पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेचे अधिकारी, अभियंते आणि १,१०० हून अधिक कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असून, सेवा शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाडीची स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे हेल्पलाइन, NTES ॲप तसेच मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गाड्यांबाबतची अद्ययावत माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. (Central Railway)
नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.






