Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. ६ जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाले असून, रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र, दुरुस्तीचे काम आव्हानात्मक असल्याने काही काळ लागण्याची शक्यता आहे. (Central Railway)


प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवासाचे नियोजन करता यावे यासाठी मध्य रेल्वेने १० जुलै ते १७ जुलै २०२६ या कालावधीत अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Central Railway)



रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, पुणे इंटरसिटी, हुबळी-दादर एक्सप्रेस, हैदराबाद-सीएसएमटी एक्सप्रेस, चेन्नई-सीएसएमटी सुपरफास्ट मेल, इंदूर-दौंड एक्सप्रेस आदी प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय महालक्ष्मी एक्सप्रेस, सातारा-दादर एक्सप्रेस, दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस तसेच विविध तारखांना धावणाऱ्या काही नियमित गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. (Central Railway)



विशेष गाड्यांनाही फटका :


भूस्खलनामुळे अनेक विशेष रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यात सीएसएमटी–गोरखपूर, पुणे–गोरखपूर, पुणे–गाझीपूर सिटी आणि पुणे–हजरत निजामुद्दीन विशेष एक्सप्रेस यांचा समावेश आहे. (Central Railway)



दरम्यान, लोणावळा–कर्जत मार्गावरील तिन्ही रेल्वेमार्ग पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेचे अधिकारी, अभियंते आणि १,१०० हून अधिक कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असून, सेवा शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाडीची स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे हेल्पलाइन, NTES ॲप तसेच मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गाड्यांबाबतची अद्ययावत माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. (Central Railway)


नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Comments
Add Comment

FDA Action : मुंबईतील नामांकित 'ऑटर्स क्लब'सह ६ आस्थापनांवर 'एफडीए'ची कारवाई

मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांविरुद्ध अन्न व औषध

Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला बूस्टर डोस; पैठणमध्ये 100, पाचोडमध्ये 50 खाटांचे रुग्णालय

मुंबई : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम

Sindhudurg Umed Mall : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'उमेद' मॉलला मंजुरी

- मंत्री नितेश राणे यांची माहिती; गणेशोत्सवाआधी जिल्ह्यातील सर्व रस्ते सुस्थितीत करण्याची पालकमंत्र्यांची

Marathi Bhasha : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलता न आल्यास 'बॅज' निलंबित करणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २० ऑगस्टपासून राज्यभरात अंमलबजावणी मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना

Mumbai University Exam New Rule : लेट लतीफ विद्यार्थ्यांना बसणार दणका; परीक्षेच्या ३० मिनिटे आधी हजेरी बंधनकारक

- मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी नवा नियम मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्न सर्व

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकर यांची सुनबाई झाली 'प्राण्यांची डॉक्टर'; नणंद साराची प्रतिक्रिया चर्चेत

क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. सचिन