Mahadev Betting App : महादेव ॲप सट्टेबाजी प्रकरणी सीबीआयकडून ११ आरोपपत्रे दाखल

वी दिल्ली: महादेव ॲप ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुरुवारी एक मोठी कारवाई करत न्यायालयात ११ आरोपपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये भ्रष्टाचाराशी संबंधित सहा, तर बेकायदेशीर सट्टेबाजी नेटवर्कशी संबंधित पाच आरोपपत्रांचा समावेश आहे. या कारवाईमुळे सट्टेबाजी सिंडिकेटच्या तपासाला मोठा वेग आला आहे. असीम दास, रोहित गुलाटी, विकास छापडिया, अनिल धम्मानी, विशाल आहुजा आणि धीरज आहुजा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा व आयपीसीच्या(IPC) विविध कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या विरोधात सीबीआयने अतिरिक्त पुरावे सादर केले आहेत.



दुसऱ्या प्रकरणात सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि सट्टेबाजी सिंडिकेटच्या विविध पॅनेलच्या ६६ सदस्यांविरुद्ध ५ आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. यामध्ये आयपीसी आणि छत्तीसगड जुगार प्रतिबंधक कायद्याचा वापर करण्यात आला आहे. सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे की, सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे परदेशातून हे रॅकेट चालवत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील लाखो वापरकर्त्यांना त्यांनी या सट्टेबाजीच्या जाळ्यात ओढले होते. सट्टेबाजीद्वारे मिळालेला काळा पैसा 'म्युल' बँक खात्यांच्या माध्यमातून परदेशात वळवून त्याचे मनी लाँड्रिंग(Money Launderin) केले जात होते. तसेच, या बेकायदेशीर धंद्याला अभय देण्यासाठी काही सरकारी कर्मचाऱ्यांना 'प्रोटेक्शन मनी' म्हणून लाच दिली जात असल्याचा गंभीर आरोपही सीबीआयने केला आहे.



सिंडिकेटचे प्रमुख आणि अनेक सहकारी काही वर्षांपूर्वीच पश्चिम आशियातील देशांत पळून गेले आहेत. यातील ४ मुख्य आरोपींविरुद्ध 'रेड कॉर्नर नोटीस' जारी करण्यात आली असून, त्यांना 'फरारी आर्थिक गुन्हेगार' घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सट्टेबाजी सिंडिकेटचा संपूर्ण विस्तार, त्यांचे आर्थिक धागेदोरे आणि याला लाभलेले कथित राजकीय व प्रशासकीय पाठबळ शोधण्यासाठी सीबीआयचा तपास सुरू आहे. येणाऱ्या काळात आणखी आरोपपत्रे दाखल होण्याची दाट शक्यता सीबीआयने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Bengaluru Traffic Viral Post : बंगळुरुच्या ट्रॅफिकमुळे सकाळी १० वाजता ऑफिस रिकामं; स्टार्टअप संस्थापकाची उद्विग्न पोस्ट व्हायरल

बंगळुरु : आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरु (Bengluru) शहरातील वाहतूक कोंडीचा फटका आता थेट कर्मचाऱ्यांच्या

Crime News : नवरा गाढ झोपलाय ना? ३ वेळा जाऊन पाहिलं, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या खोलीत वास्तव्य; बंगळुरुतील दुहेरी हत्याकांडाचा थरार

बंगळुरु : सोशल मीडियावरून झालेल्या अनैतिक संबंधांमधून एका पाच वर्षांच्या चिमुकल्यासह त्याच्या वडिलांची

Kangana Ranaut : "मी देशाची अंधभक्त!" ईशा कोप्पिकरच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ; तर खासदार कंगना राणौतची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई : अभिनेत्री ईशा कोप्पिकरने अलिकडेच सोशियल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत स्वतःला 'अंधभक्त' म्हटल्या

Testicle Traffickers : कोट्यवधी रुपयांच्या आमिषाने प्रायव्हेट पार्ट काढला आणि विकत कोण घेईना म्हणून...सोशल मीडिया रील पाहून १६ वर्षीय मुलाची हत्या

भोपाळ : सोशल मीडियावरील एका चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या व्हिडिओमुळे एका १६ वर्षांच्या निष्पाप मुलाला आपला जीव

Ram Mandir Prasad : अयोध्या राम मंदिर 'प्रसाद'च्या नावाखाली फसवणूक; ॲमेझॉनला १ लाख रुपयांचा दणका

लखनऊ : श्रीराम मंदिराच्या नावाचा गैरवापर करून ऑनलाइन मिठाई विकणे ई-कॉमर्स कंपनी 'ॲमेझॉन'ला (Amazon) भलतेच महागात पडले

Moon Impact : चंद्रावर रॉकेट आदळल्याने ६० फूटांचा खड्डा; NASA च्या HD फोटोंमध्ये दिसला धडकेचा थरारक ठसा

नवी दिल्ली : चंद्राच्या पृष्ठभागावर झालेल्या एका मोठ्या रॉकेट धडकेचे स्पष्ट पुरावे आता समोर आले आहेत. अमेरिकेची