Ram Mandir Prasad : अयोध्या राम मंदिर 'प्रसाद'च्या नावाखाली फसवणूक; ॲमेझॉनला १ लाख रुपयांचा दणका

लखनऊ : श्रीराम मंदिराच्या नावाचा गैरवापर करून ऑनलाइन मिठाई विकणे ई-कॉमर्स कंपनी 'ॲमेझॉन'ला (Amazon) भलतेच महागात पडले आहे. अयोध्येतील राम मंदिराचा प्रसाद (Ayodhya Ram Mandir) सांगून सामान्य मिठाईची विक्री केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ॲमेझॉनवर १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. राम मंदिर ट्रस्टची कोणतीही परवानगी न घेता हा प्रकार सुरू असल्याने प्राधिकरणाने ही कडक कारवाई केली आहे.



भाविकांच्या भावनांशी खेळ


या प्रकरणी आदेश देताना CCPA ने स्पष्ट केले की, 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद' या नावाने एखादी वस्तू विकली जात असेल, तर कोणताही भाविक तिला देवाचा खरा प्रसादच मानणार हे उघड आहे. कोणत्याही परवानगीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी मंदिराच्या प्रसादाच्या नावाचा वापर करणे ही केवळ ग्राहकांची फसवणूक नाही, तर देश-विदेशातील कोट्यवधी रामभक्तांच्या धार्मिक भावनांचा झालेला अनादर आहे. हा आदेश मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांनी जारी केला असून ॲमेझॉनला दंडाची रक्कम १५ दिवसांत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.



मध्यस्थ असल्याचा दावा फेटाळला


'व्यापाऱ्यांची संघटना' (CAIT) द्वारे जानेवारी २०२४ मध्ये यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. या कारवाईत प्राधिकरणाने ॲमेझॉनचा बचाव पूर्णपणे फेटाळून लावला. "आम्ही फक्त एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहोत," असे सांगून ॲमेझॉनला आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले. या अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि उत्पादने आपल्या वेबसाइटवर दाखवून त्यांची विक्री सुलभ केल्यामुळे ॲमेझॉनसुद्धा या फसवणुकीत तितकीच सहभागी मानली गेली आहे. त्यामुळे त्यांना आयटी कायद्यांतर्गत मिळणाऱ्या संरक्षणाचा फायदा मिळणार नाही.



कोणती उत्पादने विकली जात होती ?


'बिहार ब्रदर्स' या ब्रँडखाली 'चंदू ट्रेडिंग कंपनी' नावाच्या विक्रेत्याकडून ॲमेझॉनवर या मिठाईंची विक्री सुरू होती. यामध्ये प्रामुख्याने तूप लाडू, खवा लाडू, बूंदी लाडू आणि गाईच्या दुधाचे पेढे या चार प्रकारच्या मिठाईंचा समावेश होता. मंदिराचा कोणताही संबंध नसताना हे पदार्थ राम मंदिराचा अधिकृत प्रसाद असल्याचे सांगून ग्राहकांना विकले जात होते.

Comments
Add Comment

Kangana Ranaut : "मी देशाची अंधभक्त!" ईशा कोप्पिकरच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ; तर खासदार कंगना राणौतची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई : अभिनेत्री ईशा कोप्पिकरने अलिकडेच सोशियल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत स्वतःला 'अंधभक्त' म्हटल्या

Testicle Traffickers : कोट्यवधी रुपयांच्या आमिषाने प्रायव्हेट पार्ट काढला आणि विकत कोण घेईना म्हणून...सोशल मीडिया रील पाहून १६ वर्षीय मुलाची हत्या

भोपाळ : सोशल मीडियावरील एका चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या व्हिडिओमुळे एका १६ वर्षांच्या निष्पाप मुलाला आपला जीव

Moon Impact : चंद्रावर रॉकेट आदळल्याने ६० फूटांचा खड्डा; NASA च्या HD फोटोंमध्ये दिसला धडकेचा थरारक ठसा

नवी दिल्ली : चंद्राच्या पृष्ठभागावर झालेल्या एका मोठ्या रॉकेट धडकेचे स्पष्ट पुरावे आता समोर आले आहेत. अमेरिकेची

Kolkata Hotel Fire : कोलकात्यात बहुमजली हॉटेलला भीषण आग; ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी अंत, ६ गंभीर जखमी

कोलकाता :  कोलकात्यातून (Kolkata) एक अत्यंत दुर्दैवी आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास येथील

Satyendra Jain : 'आप'ला मोठा धक्का! माजी मंत्री सत्येंद्र जैन ६६९ दिवसांनी पुन्हा अटकेत; दिल्ली जल बोर्ड टेंडर घोटाळ्याप्रकरणी पुन्हा अटक

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (AAP) ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांना पुन्हा एकदा अटक

YouTube New Update : YouTube क्रिएटर्ससाठी सर्वात मोठी खूशखबर! आता व्हिडिओ सुरू होताच वाढणार...24 ऑगस्टपासून बदलणार नियम!

यूट्यूबवर व्हिडिओ (YouTube Video) तयार करणाऱ्या जगभरातील आणि राज्यातील लाखो क्रिएटर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली