Ajit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'पद्मविभूषण' द्या!

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; 'पद्म' पुरस्कारासाठी शिफारस प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्काराची शिफारस करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) सर्व विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांच्या स्वाक्षरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी या संदर्भातील पत्र पाठवले असून, या पुरस्कारासाठी शिफारस प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे तातडीने पाठवण्यात यावा, अशी विनंती केली आहे.


या पत्रात तुपे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत म्हटले आहे की, २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या एका दुर्दैवी अपघातात महाराष्ट्राने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना गमावले. ही महाराष्ट्र आणि देशाची कधीही न भरून निघणारी हानी आहे. एक कणखर प्रशासक, अहोरात्र कष्ट करणारे लोकप्रतिनिधी आणि 'अॅक्शन ओरिएंटेड' नेते म्हणून त्यांनी नेहमीच जनमानसावर अधिराज्य गाजवले असून त्यांच्या या महान राष्ट्रसेवेचा आणि नेतृत्वाचा यथोचित गौरव म्हणून त्यांना केंद्र सरकारचा अत्यंत मानाचा 'पद्मविभूषण' (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर व्हावा, ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची आणि लोकप्रतिनिधींची तीव्र भावना आहे.



राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडून प्रत्येक क्षेत्राला न्याय दिला असून पायाभूत सुविधा, रस्ते विकास, मेट्रो आणि सिंचन क्षेत्रात त्यांनी घेतलेले निर्णय क्रांतिकारी ठरले आहेत. याशिवाय, महाराष्ट्रातील सहकार चळवळ मजबूत करण्यात आणि शेतकऱ्यांना संकटकाळात थेट आर्थिक मदत मिळवून देण्यात त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली, तसेच समाजघटकातील तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रशासनाला गतिमान केले. अजितदादांचे अचानक जाणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाल्यासारखे असून अशा या महान लोकनेत्याच्या अथांग परिश्रमांचा, दूरदृष्टीचा आणि जनसेवेचा मरणोत्तर सर्वोच्च सन्मान होणे हे संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद ठरेल, असे मुख्य प्रतोद चेतन तुपे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

Nashik : मालेगावमध्ये भीषण अपघात, बस-ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Nashik Bus Accident : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील चाळीसगाव रोडवरील दहिवळ शिवारात बुधवारी  भीषण अपघात घडला आहे. बस आणि

Junnar Crime : जुन्नर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

पुणे : जुन्नर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

PM Awas Yojana 2.0 : ₹२५ लाखांपर्यंत होमलोन, व्याजावर ४% सवलत; घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी योजना

नवी दिल्ली : स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची योजना राबवली जात आहे.

Nashik Crime : नाशिककरांनो सावधान ! तोतया पोलिसांनी पळवले वृद्धेचे पाच तोळ्यांचे दागिने

Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या जय भवानी रोडवरील आडके नगर येथे तोतया पोलिसांनी

Mumbai University Exam New Rule : लेट लतीफ विद्यार्थ्यांना बसणार दणका; परीक्षेच्या ३० मिनिटे आधी हजेरी बंधनकारक

- मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी नवा नियम मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्न सर्व

Deepali Chavan Suicide : दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; 5.5 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पाहा काय आहे निकाल...

 Deepali Chavan Suicide : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृत्यू