Nashik Crime : नाशिककरांनो सावधान ! तोतया पोलिसांनी पळवले वृद्धेचे पाच तोळ्यांचे दागिने

Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या जय भवानी रोडवरील आडके नगर येथे तोतया पोलिसांनी वृद्धेचे पाच तोळ्यांचे दागिने पळवले आहे. खरे पोलीस असल्याची बतावणी करत वृद्ध इसमाला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. (Nashik Crime News)



नेमकं काय घडलं ?


आडके नगर येथे वृद्ध इसम मेडिकलमध्ये पायी जात असताना त्यांना रस्त्यात तिघा तोतया पोलिसांनी (Fake Police) रोखले. चोरांनी ज्येष्ठ नागरिक महिलेला लुटले आहे, त्यामुळे तुमचे सोने सुरक्षित ठेवा असे म्हणताच हात चलाखीने महिलेचे दागिने लंपास केले. त्यांच्या हातातील बांगड्या, मंगळसूत्र असे सुमारे साडेपाच तोळ्यांचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (दि. १७) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.


आडके नगर येथे राहणाऱ्या फिर्यादी सरला मुरलीधर कुंडीकंट्टक (६८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी त्या घरातून मेडिकल दुकानामध्ये जाण्यासाठी बाहेर पडल्या. रस्त्याने त्या पायी जात असता तिघा चोरांनी त्यांना थांबवून 'आम्ही पोलिस अधिकारी आहोत, या भागात सकाळीच एका वयोवृद्ध महिलेला चोरट्यांनी लुटले आहे, तुमचे अंगावरील दागिने व्यवस्थित ठेवा' असे सांगून विश्वास संपादन केला. यावेळी वयोवृद्ध सरला यांनी हातातील ३२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या, २४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असे दोन लाख सहा हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळ्याचे दागिने अंगावरून काढून ठेवू लागल्या. यावेळी तिघांनी हात चलाखीने सोन्याचे दागिने त्यांच्याकडून स्वतःच्या ताब्यात घेत पलायन केले. (Nashik Crime News)



चोरांनी लबाडी करून दागिने चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी घरी गेल्यावर कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. उपनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभाच्या मार्गावरील गावकरी आपत्कालीन मदतीसाठी होणार सज्ज; रस्ते, रेल्वेमार्गालगतच्या गावांमध्ये आपत्कालीन प्रतिसादाचे प्रशिक्षण

Nashik Kumbhmela : महासिंहस्थ कुंभमेळा २०२७साठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या भाविकांच्या मार्गांवरील गावांनाही

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; 5 ते 6 वाहनांची धडक, रिक्षाचा चक्काचूर

पुणे: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुलाच्या तीव्र उतारावर 5 ते 6 वाहने

Ram Mandir Prasad : अयोध्या राम मंदिर 'प्रसाद'च्या नावाखाली फसवणूक; ॲमेझॉनला १ लाख रुपयांचा दणका

लखनऊ : श्रीराम मंदिराच्या नावाचा गैरवापर करून ऑनलाइन मिठाई विकणे ई-कॉमर्स कंपनी 'ॲमेझॉन'ला (Amazon) भलतेच महागात पडले

Ladki Bahin Yojana : अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाडक्या बहिणींच्या निधी वसुलीबाबत अनास्था?

- माहिती अधिकारातून समोर; ९२ लाख लाभार्थी वगळल्याने वार्षिक खर्च २९ हजार ८१९ कोटींवर मुंबई : राज्य शासनाच्या

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव