Nagpur BRICS Summit 2026 : नागपूरमध्ये ११ जुलैपासून ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची तिसरी बैठक

- जागतिक परिवहन सहकार्य, शाश्वत विकास आणि नव्या तंत्रज्ञानावर होणार मंथन


नागपूर : भारताच्या ब्रिक्स २०२६ अध्यक्षतेअंतर्गत महाराष्ट्रातील नागपूर येथे ११ आणि १२ जुलै २०२६ रोजी ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची तिसरी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून, शाश्वत परिवहन व्यवस्था, पायाभूत सुविधांचा विकास तसेच जागतिक संपर्क व्यवस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. (Nagpur BRICS Summit 2026)


भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची संकल्पना “लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि स्थिरतेसाठी निर्माण” या उद्दिष्टानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. तांत्रिक प्रगती आणि सुधारित संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासाला चालना देणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे ११ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. बैठकीला ब्रिक्स देशांचे संबंधित मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहतील. (Nagpur BRICS Summit 2026)



ब्रिक्स परिवहन कार्यगट सदस्य देशांमधील धोरणात्मक संवाद आणि सहकार्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. रशिया आणि ब्राझील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या दोन बैठकांनंतर नागपूरमध्ये होणारी ही तिसरी बैठक आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.या दोन दिवसीय या बैठकीत परिवहन क्षेत्रातील झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल. तसेच जागतिक स्तरावर राबवल्या जात असलेल्या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि भविष्यातील सहकार्याच्या नवीन क्षेत्रांवर चर्चा करण्यात येईल. (Nagpur BRICS Summit 2026)


या बैठकीत शाश्वत विमान इंधन, शहरी वाहतूक व्यवस्था, बहुआयामी परिवहन प्रणाली, सक्षम लॉजिस्टिक्स पुरवठा साखळी, कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उपाय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विशेष चर्चा होणार आहे.विस्तारित ब्रिक्स समूहात ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश आहे. हा समूह जगाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतो. (Nagpur BRICS Summit 2026)



ब्रिक्स देशांमधील मजबूत परिवहन सहकार्यामुळे व्यापाराला चालना मिळणे, प्रादेशिक तसेच आंतरखंडीय संपर्क व्यवस्था सुधारणे, लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढवणे आणि अधिक सक्षम जागतिक पुरवठा साखळी विकसित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.नागपूरमध्ये होणारी ही बैठक ब्रिक्स देशांमधील परिवहन सहकार्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे. यामुळे नागपूर शहराची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक मजबूत होईल तसेच जागतिक धोरण निर्मितीमध्ये शहराची भूमिका आणखी महत्त्वपूर्ण होण्याची शक्यता आहे. (Nagpur BRICS Summit 2026)

Comments
Add Comment

Maharashtra Rain Alert : 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान

Laxmanrao Joshi : ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन; 'व्रतस्थ संपादकाला मुकलो' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  नागपूर 'तरुण भारत'चे माजी मुख्य संपादक ल. त्र्यं. (लक्ष्मणराव) जोशी (Laxmanrao Joshi) यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री

Illegal Mining : अवैध गौण खनिज उत्खननासाठी दहापट दंड

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे समभाग भांडवल ५०० कोटींवर मुंबई : राज्यातील वाळू आणि

Satara Suicide : NEET परीक्षेतील अपयशाने खचली! कराडमधील १८ वर्षीय विद्यार्थिनीची विष प्राशन करून आत्महत्या

सातारा : गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटीमुळे देशभरात आंदोलने सुरु होती. नीट पेपरफुटीमुळे आणि परिक्षेतील

Nagpur Rain Alert Update : नागपुरात मुसळधार पावसाची जोरदार हजेरी : सखल भागात साचले पाणी, सोमलवार शाळेचे मैदान जलमय; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये (Nagpur Heavy Rain) हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.

Nagpur Manish Nagar Accident : नागपूरच्या मनीष नगरमध्ये हृदयद्रावक दुर्घटना : ३ वर्षांच्या चिमुकल्याचा कारखाली चिरडून मृत्यू; थरार CCTV मध्ये कैद

नागपूर : नागपूर शहरातील मनीष नगर परिसरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांच्या