Rain Alert : देशभरात मुसळधार पावसाचा कहर; अनेक राज्यांत रेड व ऑरेंज अलर्ट

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांत देशातील निम्म्याहून अधिक भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, सिक्कीम, कर्नाटक, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य भारतात ९ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.



याशिवाय उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, गुजरात, पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा आणि किनारपट्टीवरील कर्नाटक या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, येथेही जोरदार पावसाची शक्यता आहे. दिल्लीसह पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही भागांतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 9 जुलैनंतर मध्य भारतातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून, गुरुवारपासून पावसाचे प्रमाण घटण्याचा अंदाज आहे.



गेल्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र(Maharahstra) आणि दक्षिण कर्नाटकमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस झाला. या भागांत 21 सेंटीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाली असून, अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तसेच मराठवाडा, सौराष्ट्र-कच्छ, मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, कर्नाटकचा किनारी भाग, बिहार, मेघालय आणि त्रिपुरा येथे 12 ते 20 सेंटीमीटरपर्यंत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, माहे, उत्तर अंतर्गत कर्नाटक तसेच उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे 7 ते 11 सेंटीमीटरपर्यंत मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये वाहनचालक पडल्याच्या घटना समोर आल्या असून, काही ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना अनेक तास अडकून राहावे लागत असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे.



महाराष्ट्र, गुजरात, जम्मू-काश्मीरमधील अतिवृष्टीचा अमित शाहांनी घेतला आढावा


देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी सविस्तर माहिती घेतली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूर आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. गृहमंत्री शाह(Shah) यांनी संबंधित राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा, पूरसदृश परिस्थितीचा आणि मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यांनी राज्य सरकारांना बाधित लोकांची सुरक्षा, मदत आणि पुनर्वसन यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. या आव्हानात्मक काळात केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आवश्यकतेनुसार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन शाह यांनी दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना राज्य सरकारांशी सतत समन्वय साधून मदत आणि बचाव कार्यात सर्वतोपरी सहकार्य सुनिश्चित करण्याचे निर्देशही दिले आहे.

Comments
Add Comment

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात

Shahzad Bhatti Network : केंद्र सरकारची मोठी कारवाई : ISI समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा पर्दाफाश; १४ राज्यांतून २५३ जण ताब्यात

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केंद्र

Smriti Irani News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिलांना मोठं स्थान; स्मृती इराणींचे मुख्य संघटनेत दणकेबाज कमबॅक!

नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या

Lakshmanan Meyyappan Youngest CA : अवघ्या १६ व्या वर्षी कमाल! लक्ष्मणन मेय्यप्पन ठरला जगातील सर्वात तरुण 'चार्टर्ड अकाउंटंट'

दुबई : वयाच्या सोळाव्या वर्षी जिथे बहुतेक तरुण आपल्या भविष्याची आणि करिअरची दिशा शोधत असतात, तिथे एका भारतीय