Nashik : नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; 'या' तालुक्यांमधील शाळांना सुट्टी

Nashik : नाशिकमध्ये रविवारपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. ढगसदृश्य परिस्थिती नाशिकमध्ये टळली असली तरी नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्याने (IMD) 'येलो अलर्ट' जारी केला असून, उद्या म्हणजेच ९ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.(nashik rain update)



इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी


या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील पूर्व प्राथमिक (Pre-school) तसेच इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ​या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी माहिती दिली आहे. सध्या दक्षिण गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांवर होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची एक तातडीची बैठक पार पडली, ज्यामध्ये सर्व विभागांशी चर्चा करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. (nashik rain update)



​'या' ६ तालुक्यांमधील शाळा राहणार बंद


​उद्या, ९ जुलै रोजी जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता खालील ६ तालुक्यांमधील पूर्व प्राथमिक आणि इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत:


त्र्यंबकेश्वर (त्र्यंबक)


​कळवण


​इगतपुरी


​पेठ


​सुरगाणा


​बागलण



​त्र्यंबकेश्वर मंदिर सुरू, तर सप्तशृंगी गड बंद


​धार्मिक स्थळांबाबत माहिती देताना राजपूत यांनी स्पष्ट केले की, धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या निर्णयानुसार त्र्यंबकेश्वर मंदिर उद्या (९ जुलै) भाविकांसाठी खुले राहणार आहे. मात्र, दुसरीकडे उपविभागीय अधिकारी कळवण यांच्या आदेशानुसार सप्तशृंगी गड ७ जुलै ते ९ जुलै या कालावधीत बंद ठेवण्यात आला असून, हा निर्णय उद्यापर्यंत कायम राहणार आहे. (nashik rain update)



पर्यटनस्थळे आणि धबधबे पुढील रविवारपर्यंत बंद


​पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे आणि धबधबे येत्या पुढच्या रविवारपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, आठवडे बाजार आणि धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आठवडे बाजारांबाबत स्थानिक परिस्थितीचा विचार करून तेथील क्षेत्रीय अधिकारी योग्य तो निर्णय घेतील.


​जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना या संपूर्ण कालावधीत सतर्क राहण्याचे आणि सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Philippines News : धक्कादायक! फिलीपिन्समधील शाळेत गोळीबार; 2 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

फिलीपिन्स : फिलीपिन्समध्ये शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण फिलीपिन्समधील झांबोआंगा

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.