Nashik Rain Update : नाशिकमध्ये पाणीच पाणी , गोदावरीला हंगामातील पहिला पूर; रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी

Nashik Rain Update : नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले असून रामसेतूलाही पाणी लागले आहे. त्यामुळे नदीकाठावरील परिसरात पूरस्थितीचे चित्र निर्माण झाले असून नागरिक मोठ्या संख्येने पूर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.



नद्या दुथडी भरून वाहण्यास सुरुवात


या पुराचे वैशिष्ट्य म्हणजे गंगापूर धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. धरणाचे दरवाजे बंद असतानाही गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार आणि जोरदार पावसामुळे नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी, गोदावरीची पाणीपातळी वेगाने वाढून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.


पूराच्या पाण्यामुळे रामकुंड परिसरातील अनेक घाट पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या परिसरावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे.


हवामान विभागाने पुढील काही तासांतही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात उतरणे टाळावे, तसेच पूरग्रस्त भागात विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Philippines News : धक्कादायक! फिलीपिन्समधील शाळेत गोळीबार; 2 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

फिलीपिन्स : फिलीपिन्समध्ये शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण फिलीपिन्समधील झांबोआंगा

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू