Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार


मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची (नर्सिंग स्टाफ) उपलब्धता वाढविण्याच्या आणि गरीब विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांद्वारे अत्यंत कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाने नर्सिंग शिक्षणाच्या विस्तारास मान्यता दिली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी बुधवारी विधानसभेत निवेदनाद्वारे या निर्णयाची घोषणा केली. या महत्त्वाकांक्षी विस्तार प्रकल्पासाठी राज्य सरकारने ४९१.९१ कोटी रुपयांच्या अनावर्ती आणि वार्षिक १२.५८ कोटी रुपयांच्या आवर्ती खर्चास मंजुरी दिली असून, यामुळे राज्यातील शासकीय आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.



वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत सादर केलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नर्सिंगच्या जागा वाढवण्यासाठी आणि नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी त्रिस्तरीय आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, मुंबई (जी.टी. रुग्णालय), मुंबई (सेंट जॉर्जेस रुग्णालय), धुळे, सोलापूर, अंबाजोगाई (बीड), अकोला, नागपूर (आयजीएमसी) आणि सांगली येथील ८ शासकीय 'जी.एन.एम.' महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन (अपग्रेडेशन) केले जाणार आहे. या सर्व ठिकाणी आता १०० प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येतील. याशिवाय, मुंबई (जे.जे. रुग्णालय), नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे व नांदेड या ५ विद्यमान शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांची सध्याची ५० असणारी प्रवेश क्षमता आता १०० करण्यात येणार आहे. (Hasan Mushrif)



सिंधुदुर्गसह १० नवीन महाविद्यालये :


राज्यातील नर्सिंग शिक्षणाचे जाळे अधिक विस्तारण्यासाठी चंद्रपूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अलिबाग, रत्नागिरी, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, पालघर आणि अहिल्यानगर अशा १० जिल्ह्यांमध्ये नवीन बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. तर उर्वरित ठाणे, सातारा, नाशिक, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, वाशिम, वर्धा आणि भंडारा या १० जिल्ह्यांमध्येही अशी महाविद्यालये सुरू करण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभागृहात दिली. (Hasan Mushrif)

Comments
Add Comment

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील