Tuesday, July 7, 2026

Powai Lake crocodile : पवई तलावाजवळील रहिवासी भागात मगर शिरली; वन विभागाच्या पथकाकडून सुखरूप रेस्क्यू

Powai Lake crocodile : पवई तलावाजवळील रहिवासी भागात मगर शिरली; वन विभागाच्या पथकाकडून सुखरूप रेस्क्यू
मुंबई : पवई तलावालगतच्या मोरारजी नगर परिसरात मंगळवारी सुमारे सात फूट लांबीची मगर ( Powai Lake crocodile)आढळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दर्ग्याजवळ मगर दिसताच स्थानिकांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. (Mumbai News)
माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. संयुक्त मोहिमेद्वारे मगरीला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या मगरीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून तिची प्रकृती स्थिर आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. (Forest Department)
पावसाळ्यात तलाव आणि जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने वन्य प्राणी अधूनमधून मानवी वस्त्यांमध्ये येण्याच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने वन विभागाला माहिती द्यावी आणि प्राण्यापासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >