Nashik : नाशिकमधील टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका अविवाहित तरुणीवर अत्याचार तसेच जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणात नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा एजाज खान हिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Nashik TCS Case Nida Khan)
Nashik Crime : फेसबुकवर मैत्री, मंत्रालयात ओळख असल्याचा दावा अन सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष आणि त्यानंतर कोट्यवधी रुपयांची फसवणूक. नाशिकमध्ये सायबर ...
दरम्यान, या गुन्ह्यातील सहआरोपी तौसिफ अत्तार याच्यावर विनयभंगाचा आरोप असल्याने त्यालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, बलात्काराचा गंभीर आरोप असलेल्या मुख्य संशयित आरोपी दानिश शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला असून तो सध्या न्यायालयीन कोठडीतच राहणार आहे. (Nashik TCS Case Nida Khan)
हे प्रकरण संवेदनशील असल्याने त्याचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५०० पानांचे सविस्तर दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. (Nashik TCS Case Nida Khan)
भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ...
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. दरम्यान, निदा खान फरार असताना तिला छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांनी आश्रय दिल्याचा संशयही तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. (Nashik TCS Case Nida Khan)






