Pune Mumbai Expressway : मुसळधार पावसाचा मोठा फटका; पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि जुना महामार्ग दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद

मुंबई : राज्यातील मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. भूस्खलन, रस्त्यावरून वाहणारे पाणी आणि इतर धोकादायक परिस्थितीमुळे दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.


प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील 'कनेक्टिंग लिंक' आणि 'मिसिंग लिंक' दरम्यान काँक्रीटचा खांब कोसळल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. (Pune Mumbai Expressway)



दरम्यान, मावळ आणि ताम्हिणी घाट परिसरातही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातून मुंबईकडे जाणारे काही पर्यायी मार्गदेखील पाण्याखाली गेल्याने ते वापरणे धोकादायक ठरत आहे.


या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारण नसल्यास

">पुणे आणि मुंबईदरम्यानचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवास पुढे ढकलावा आणि वाहतूक विभाग व स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.


वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणा घटनास्थळी कार्यरत असून रस्त्यांवरील अडथळे दूर करण्याचे काम सुरू आहे. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.



प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमांद्वारे मिळणाऱ्या अद्ययावत माहितीनुसारच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.


Tags
heavy rainlandslideMavalpune mumbai expresswaypune mumbai highwayMaharashtra newsPune newsMumbai NewsTamhini ghatMaharashtra Raintraffic update
Comments
Add Comment

Ahilyadevi Holkar Karj Mukti Yojana : आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ

- राज्य सरकारचा निर्णय; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती' योजनेसाठी मानक कार्यप्रणाली

Water Ambulance : मुंबई महानगर प्रदेशात सुरू होणार 'वॉटर ॲम्ब्युलन्स'

- मंत्री नितेश राणे यांची माहिती; संबंधित विभागांना संयुक्त प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Chandrashekhar Bawankule : सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटपासाठी सुधारित धोरण

- २०१० पासूनची स्थगिती उठणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यामध्ये सहकारी गृहनिर्माण

SIR : महाराष्ट्रात 'एसआयआर'च्या वेळापत्रकात बदल

- केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय; प्रारूप यादी आता ३१ ऑगस्टला प्रसिद्ध होणार मुंबई : महाराष्ट्रातील

Eknath Shinde : 'फार्म टू फॉरेन' मोहिम देणार महाराष्ट्रातील कापड उद्योगाला जागतिक स्थान - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादने आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकरणार

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; 5 ते 6 वाहनांची धडक, रिक्षाचा चक्काचूर

पुणे: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुलाच्या तीव्र उतारावर 5 ते 6 वाहने