Women's T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा महिला टी-२० क्रिकेटवर दबदबा कायम; इंग्लंडला हरवत विक्रमी सातव्यांदा विश्वविजेते

Women's T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध करत टी-२० विश्वचषकाचे (Women's T20 World Cup) विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडचा ७ विकेट्सने पराभव करत ऑस्ट्रेलियाने विक्रमी सातव्यांदा महिला टी-२० विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. ( Australia Women)

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ बाद १५० धावा केल्या. कर्णधार नॅट स्कीवर-ब्रंट हिने ५३ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. फ्रेया कॅम्पने २८ चेंडूत ४४ धावा करत संघाला चांगली साथ दिली, तर एलिस कॅपसीने २३ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून किम गार्थ, लुसी हॅमिल्टन, सोफी मोलिनिक्स आणि एनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (England Women)



१५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. बेथ मुनीने ४९ चेंडूत ६४ धावांची दमदार खेळी केली, तर फोबे लिचफिल्डने ३५ चेंडूत ४८ धावा करून विजयाचा पाया रचला. एलिस पेरी १३ धावांवर नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियाने केवळ १७.१ षटकांत ३ विकेट्स गमावत लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून चार्लोट डीन, लॉरेन बेल आणि सोफी एक्लिस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. (Women's T20 World Cup)



या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावला नाही. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत त्यांनी उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि अंतिम फेरीत इंग्लंडवर मात करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.


याआधी ऑस्ट्रेलियाने २०१०, २०१२, २०१४, २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता. आता २०२६ मधील विजेतेपदासह त्यांनी सातव्यांदा ट्रॉफी उंचावत महिला टी-२० क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.


Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील