Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे ‘चरणसेवा’ उपक्रम राबविण्यात आला. नाशिक जिल्ह्यात १,१४८ विद्यार्थ्यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज (Saint Nivruttinath Maharaj) यांच्या पालखीसोबत सहभागी झालेल्या २६ हजार ८९१ वारकऱ्यांची चरणसेवा केली. निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी रोहितकुमार राजपूत (Rohit Kumar Rajput) यांनी याबाबत माहिती दिली.



आषाढी एकादशीनिमित्त संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर मार्गे अहिल्यानगर जिल्ह्याकडे प्रस्थान करत आहे. पालखीसोबत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या चरणसेवेचा हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्या वर्षी राबविण्यात आला. जिल्ह्यात २९ जून ते ५ जुलै या कालावधीत पेगलवाडी, महिरावणी, सातपूर, गणेशवाडी, मुक्तीधाम, पळसे, पास्ते, लोणारवाडी, दातली, खंबाळे आणि निऱ्हळ (ता. सिन्नर) येथे दुपारचा विसावा व रात्रीचा मुक्काम या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.



वारीसोबत मुख्यमंत्री जनजागृती आरोग्य रथही सहभागी असून, या रथाच्या माध्यमातून पंढरपूरपर्यंत शासकीय आरोग्य योजनांची माहिती वारकऱ्यांना देण्यात येणार आहे. यावर्षी ‘मुख्यमंत्री सुखद आरोग्य वारी’ उपक्रमांतर्गत मोबाईल इको टॉयलेट वाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, श्वास फाऊंडेशन आणि ऑप्टिसमार्ट इको सोल्यूशन यांच्या समन्वयातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत कक्षाचे स्थानिक प्रमुख डॉ. चैतन्य बैरागी, समन्वयक अमित डेरे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक महेश नारायणकर आदींनी परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

Nag Panchami 2026 : नागपंचमीला 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्ह

Nashik : 'मिशन ग्रीन मान्सून' चा रविवारी ८ वा टप्पा, ऑनलाइन नोंदणी केलेल्या नाशिककरांना होणार थेट देशी रोपांचे वाटप

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत नाशिक शहर हरित व समृद्ध बनवण्यासाठी

Nashik : नाशिक महापालिकेत महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते ध्वजारोहण

Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे महापौर हिमगौरी

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Nashik : नाशिकमध्ये वीर सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘वीर प्रेरणास्थळ’ उभारणार, वीरनारी यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मान

Nashik : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान

Nashik : जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील