नवी दिल्ली : जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) आपल्या कारकिर्दीबाबत मोठी घोषणा केली आहे. २०२६ चा फिफा विश्वचषक हा आपल्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असेल, असे रोनाल्डोने स्पष्ट केले. स्पेनविरुद्धच्या महत्त्वपूर्ण 'राऊंड ऑफ १६' सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत त्याने ही भावनिक घोषणा केली.
पाच वेळा बॅलन डी'ऑर विजेता असलेल्या रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) क्लब आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये असंख्य विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र, अद्याप त्याच्या कारकिर्दीत फिफा विश्वचषक विजेतेपदाची भर पडलेली नाही. त्यामुळे २०२६ च्या स्पर्धेत पोर्तुगालला विश्वविजेते बनवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो अखेरचा प्रयत्न करणार आहे.
सहा विश्वचषकांचा अविस्मरणीय प्रवास :
२०२६ च्या स्पर्धेसह रोनाल्डोने तब्बल सहा फिफा विश्वचषकांमध्ये सहभाग नोंदवला आहे. २००६ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक खेळणाऱ्या रोनाल्डोने त्यानंतर २०१०, २०१४, २०१८, २०२२ आणि आता २०२६ अशा प्रत्येक स्पर्धेत पोर्तुगालचे नेतृत्व केले. जवळपास दोन दशकांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या रोनाल्डोची ही कारकीर्द आधुनिक फुटबॉलमधील सर्वात यशस्वी प्रवासांपैकी एक मानली जाते. (Cristiano Ronaldo)
विशेष म्हणजे, पुढील २०३० च्या फिफा विश्वचषकाचे संयुक्त यजमानपद पोर्तुगाल, स्पेन आणि मोरोक्को यांच्याकडे असणार आहे. मात्र, त्या स्पर्धेत खेळाडू म्हणून आपण मैदानात दिसणार नसल्याचे रोनाल्डोने अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.
मेक्सिको सिटी: एस्टाडिओ अझ्टेका स्टेडियमवर रविवारी रात्री फुटबॉल विश्वाला चकित करणारा सामना पाहायला मिळाला. १० खेळाडूंसह ...
"फुटबॉलला मी माझे सर्वस्व दिले"
पत्रकार परिषदेत बोलताना रोनाल्डो म्हणाला, "प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. हा माझा शेवटचा विश्वचषक आहे. पण माझ्या आयुष्यातील हा शेवटचा आनंदाचा क्षण नसेल. निवृत्तीचा दिवस एक ना एक दिवस येणारच आहे. मात्र, उद्या काहीही झाले तरी मी पूर्ण समाधानाने आणि स्वच्छ मनाने निवृत्त होईन. मी फुटबॉलला शंभर टक्के नव्हे, तर हजार टक्के दिले आहे." त्याने पुढे सांगितले, "मी अजूनही फुटबॉलचा तितकाच आनंद घेतो. मी खेळतो कारण मला हा खेळ मनापासून आवडतो. प्रत्येक दिवस जगण्यासारखा असतो. या विश्वचषकात मी तीन गोल केले आहेत आणि मला वाटते, मी अजूनही चांगला खेळत आहे." (Cristiano Ronaldo)
"हा विश्वचषक कायम आठवणीत राहील" :
२०२६ चा विश्वचषक आपल्या आयुष्यातील सर्वात भावनिक स्पर्धा ठरेल, असेही रोनाल्डोने सांगितले. "या विश्वचषकातील अनुभव अविस्मरणीय आहे. मैदानावरील खेळ जितका महत्त्वाचा आहे, तितक्याच मैदानाबाहेरील आठवणीही खास आहेत. जगभरातील चाहत्यांकडून मिळालेले प्रेम मला प्रत्येक क्षणी जाणवले. माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात भावनिक विश्वचषक ठरला आहे आणि त्यामुळेच तो माझ्या कायम स्मरणात राहील," असे तो म्हणाला. (Cristiano Ronaldo)
ईस्ट रदरफोर्ड, एनजे: फुटबॉलच्या जगाला हादरवून टाकणाऱ्या एका ऐतिहासिक सामन्यात, नॉर्वेने पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलचा २-१ ने पराभव करून ...
स्पेनविरुद्धची मोठी कसोटी :
दरम्यान, पोर्तुगालसमोर आता स्पेनविरुद्धच्या 'राऊंड ऑफ १६' सामन्याचे मोठे आव्हान आहे. या विश्वचषकातील सर्वात अटीतटीच्या लढतींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून पुढील फेरी गाठण्याचा पोर्तुगालचा प्रयत्न असेल. रोनाल्डोसाठीही हा सामना केवळ स्पर्धेतील पुढील टप्पाच नव्हे, तर आपल्या अखेरच्या विश्वचषक प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे. (Cristiano Ronaldo)
View this post on Instagram




