Khed News : खेडमधील धक्कादायक घटना! धावत्या मांडवी एक्स्प्रेसमधून चिमुकल्यासह तिघांनी मारली उडी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मडगावहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus - CSMT) जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसमधून (Mandovi Express) एका पुरुषाने लिव्ह-इन संबंधात (Live-in Relationship) राहणाऱ्या महिलेसह आणि त्यांच्या दीड वर्षांच्या मुलाला घेऊन धावत्या रेल्वेतून (Train) उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून पुरुष आणि चिमुकला गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या दुर्घटनेत शुभ्रा अतिश दिवेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.


सचिन जुवळे, शुभ्रा दिवेकर आणि त्यांचा मुलगा हे तिघे मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसने (Mandovi Express) प्रवास करत होते. खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ रेल्वे पोहोचताच त्यांनी धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची माहिती समोर आली आहे.



घटनेनंतर रेल्वेतील प्रवाशांनी तातडीने रेल्वे पोलिसांना (Railway Police) माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शुभ्रा दिवेकर यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Postmortem) करण्यात येत असून सचिन जुवळे आणि त्यांच्या मुलावर उपचार सुरू आहेत.



टोकाचे पाऊल का उचलले?


तिघांनी धावत्या रेल्वेतून उडी का मारली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक ताण (Mental Stress) किंवा इतर कोणते कारण यामागे आहे का, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार हा आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी खेड पोलीस (Police) सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले, दोन्ही सभागृहांची १२ विधेयकांना मंजुरी

नवी दिल्ली : सोमवार २० जुलै २०२६ रोजी सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी अनिश्चित

Rohan Jadhav : १० कोटींचा घोटाळा, ५४३६ बँक खाती, थेट हाँगकाँगपर्यंत कनेक्शन, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : काही महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिक व्यक्तीची १० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची घटना समोर आली.

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा