Ketan Agrawal Murder Case : ...अखेर खेळ उलटला! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनला दिलासा, कोर्टाने मागणी फेटाळली

सिया चेतनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पोलिसांची मागणी फेटाळली


पुणे : केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder Case) प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची पुणे ग्रामीण पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा, कथित सराव झालेल्या ठिकाणाची पाहणी, पासपोर्ट फाडल्याचा पंचनामा आणि जप्त केलेल्या वस्तूंबाबत माहिती न्यायालयासमोर मांडली. तसेच आरोपींच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यात आल्याचे सांगत त्यातील सांकेतिक भाषेतील संभाषणाची पडताळणी करण्यासाठी समोरासमोर चौकशी आवश्यक असल्याचा दावा करण्यात आला.



तपासादरम्यान या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घ्यायचा असल्याचे पोलिसांनी सांगत तीन दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी मागितली होती. (Pune Crime)


सरकारी पक्षानेही पोलीस कोठडीची मागणी करत मोबाईलमधील माहिती आणि सांकेतिक संदेशांची चौकशी महत्त्वाची असल्याचे सांगितले. मात्र सिया गोयलच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी तपासात ती पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगत पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. चेतन चौधरीच्या वकिलांनीही केवळ शक्यतांच्या आधारावर पोलीस कोठडी देता येणार नसल्याचे न्यायालयात नमूद केले.



दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांनी दिलेली कारणे पोलीस कोठडीसाठी (Police Costody) पुरेशी नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नार्को चाचणीसाठी आरोपींची संमती आवश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.


यानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता दोन्ही आरोपींकडून जामिनासाठी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



लोहगड हत्या प्रकरणात बीड कनेक्शन


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपींनी केतनला ढकल्यानंतर बीडमधील एका तरुणाशी संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींनी बीडच्या तरुणाशी सविस्तर चर्चा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून संबंधित तरुणाला या कटाची आधीपासूनच पूर्वकल्पना होती का, या दिशेने कसून चौकशी केली जात आहे.तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांना हे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या हत्येच्या पूर्वनियोजित कटामध्ये बीडच्या या तरुणाची भूमिका काय होती आणि त्याने आरोपींना काही मदत केली होती का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तातडीने कारवाई करत आहे.

Comments
Add Comment

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी