Rohan Jadhav : १० कोटींचा घोटाळा, ५४३६ बँक खाती, थेट हाँगकाँगपर्यंत कनेक्शन, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : काही महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिक व्यक्तीची १० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची घटना समोर आली. या घोटाळ्याप्रकरणी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला पुण्यात अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी रोहन जाधव या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची सर्व बँक खाती जप्त केली व त्याचे सर्व आर्थिक स्रोतही गोठवले. त्यानंतर रोहन स्वतःहून न्यायालयात हजर झाला. (Rohan Jadhav)


ही घटना साधारणपणे जानेवारीच्या सुमारास घडली. फसवणूक करणाऱ्या टोळीने आपण CBI चे अधिकारी आल्याचे भासवून एका ज्येष्ठ व्यक्तीशी संपर्क साधला. त्यांनी या व्यक्तीला त्यांच्यावर एका प्रकरणाचा आरोप आहे व यामुळे त्यांना डिजिटल अटक होऊ शकेल अशी धमकी दिली. कायदेशीर कारवाई टाळण्याच्या बहाण्याने या टोळीने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात तब्बल १०.७४ कोटी हस्तांतरित करण्यास सांगितले. (Rohan Jadhav)



आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने पोलिसांशी संपर्क साधला. आरोपींपैकी एकाने एटीएममधून पैसे काढल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर हर्षद सुभाष धंतोळे, समर्थ सुरेश देशमुख, अमर शिवाजी अत्तरगी या तिघांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, धंतोळेने खुलासा केला की त्याने काढलेले पैसे फरार असलेल्या रोहन जाधव याला दिले होते. मूळचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असलेल्या रोहनने फसवणुकीने मिळवलेली १०.७४ कोटी रुपयांची रक्कम एकूण ५,४३६ बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली होती. तो टेलिग्राम अॅपद्वारे हाँगकाँगमधील व्यक्तींच्या संपर्कात होता आणि त्यांच्याशी वारंवार व्हिडिओ कॉलवर बोलत असे, असे तपासात उघड झाले आहे.


पोलिसांनी सांगितले की, रोहन जाधवने त्याच्या हाँगकाँगमधील हस्तकांबरोबर डिजिटल क्रिप्टोकरन्सीचा वापर करून आर्थिक व्यवहार केले आणि भारतातून परकीय चलनात पैसे हस्तांतरित करण्यासाठी त्याला मोठी दलाली मिळाली. रोहन जाधव, हा एक इन्फ्लुएन्सर आहे शिवाय सेलिब्रिटी मॅनेजमेंटमध्येही काम करतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रोहन जाधवच्या विरोधात एक पुण्यात आणि दुसरा पिंपरी-चिंचवडमध्ये असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Hong Kong)

Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले, दोन्ही सभागृहांची १२ विधेयकांना मंजुरी

नवी दिल्ली : सोमवार २० जुलै २०२६ रोजी सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी अनिश्चित