मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन; कनेक्टिंग लिंकवरील खड्ड्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर
मुंबई : "राज्यात मुंबई महानगर प्रदेशासह (एमएमआर) ठाणे, रायगड, पालघर, पुणे, नाशिक आणि इतर भागात ६ जुलैपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. सरासरीपेक्षा कितीतरी जास्त पाऊस होण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी हवामान विभागाचे 'अलर्ट' पाहूनच घराबाहेर पडावे आणि शक्यतो प्रवास टाळावा," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. (Devendra Fadnavis)
मुंबई : मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी (Jogeshwari) पश्चिम परिसरात मध्यरात्री भीषण 'हिट अँड रन'ची (Hit And Run) घटना घडली. अमृत नगर येथील अजित ग्लास गार्डन गेटसमोर भरधाव टँकरने ...
पावसाची भीषणता लक्षात घेऊन अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आली असून, राज्य सरकारकडून नागरिकांना दर तीन तासांनी मोबाईलवर एसएमएसद्वारे अलर्ट पाठवले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापनाच्या सज्जतेबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, "एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहेत. ज्या ज्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत, त्या तात्काळ दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघात टाळण्यासाठी आम्ही सातत्याने सूचना देत आहोत, लोकांनी या अलर्ट्सचे तंतोतंत पालन करावे."कनेक्टिंग लिंकवर पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आणि समाजमाध्यमांवरून होणाऱ्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला. "कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे, तिथे केवळ दोन खड्डे पडले आहेत. मात्र, पूर्ण कनेक्टिंग लिंकवरच खड्डे पडल्याचा डांगोरा पिटणे चुकीचे आहे. काही लोकांना प्रत्येक गोष्टीचा बाऊ (Amplify) करण्यातच आनंद मिळतो," असा टोला त्यांनी लगावला.
View this post on Instagram
वस्तुस्थिती काय?
"कुठलेही मोठे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या पावसात त्याची 'ड्युरॅबिलिटी टेस्ट' (Durability Test) (टिकाऊपणाची चाचणी) होत असते. नवीन उड्डाणपुलावर जेव्हा 'मॅस्टिक डांबर' टाकले जाते, तेव्हा ते सुरुवातीला एका जागी जमा होते आणि नंतर सेटल होते. या इंजिनिअरिंगच्या गोष्टी आहेत. तथापि, 'निंदकाचे घर असावे शेजारी' या उक्तीप्रमाणे जर काही कमतरता समोर आणल्या असतील, तर एमएसआरडीसी योग्य काळजी घेऊन त्या नक्कीच रेक्टिफाय (दुरूस्त) करेल", असे मुख्यमंत्री म्हणाले. नकारात्मक राजकारण करणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "देशातला सर्वात उंच पूल, देशातले सर्वात रुंद बोगदे आणि देशात पहिल्यांदाच धरणाच्या खालून बोगदा तयार करण्याचे ऐतिहासिक काम आपण करून दाखवले आहे. त्यामुळे निव्वळ टीका करण्यापूर्वी, हे अद्भूत काम करणाऱ्या इंजिनिअर्सचेही आभार मानले पाहिजेत, याचे भान टीकाकारांनी ठेवावे", असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. (Devendra Fadnavis)






