'बाईंची शाळा': एक आठवण

मराठी रंगभूमीवर 'बाई' या संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी या आठवड्यात आयुष्याच्या रंगमंचावरून 'एक्झिट' घेतली आणि रंगभूमीवरचे एक पर्व काळाच्या पडद्याआड गेले. बाईंनी रंगकर्मी या नात्याने रंगभूमी गाजवलीच; पण त्याचबरोबर त्यांच्या रूपाने एक विद्यापीठ म्हणून त्यांचे स्थान नाट्यसृष्टीत निर्माण झाले. त्यांची एक आठवण म्हणजे दहा वर्षांपूर्वी बाईंनी चक्क कलावंतांची 'शाळा' घेतली होती. पण हे करताना, 'मी कार्यशाळा घेत असले तरी मी शिक्षिका नाही, तर आजही विद्यार्थिनीच आहे', असे सांगत त्यांची त्याविषयीची भूमिकाही स्पष्ट केली होती.



बाईंच्या 'स्कूल'चे धडे गिरवलेले विक्रम गोखले, नाना पाटेकर, सुहास जोशी, नीना कुलकर्णी, भारती आचरेकर, प्रतिमा कुलकर्णी आदी ज्येष्ठ रंगकर्मींपासून; नव्या पिढीतल्या अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी यांच्यापर्यंतच्या आघाडीच्या कलाकारांची शाळा 'बाई' घेणार, हा तेव्हा औत्सुक्याचा विषय ठरला होता. ही शाळा घेण्यामागचे कारण स्पष्ट करताना बाईंनी मांडलेली भूमिका महत्त्वाची होती. त्या म्हणाल्या होत्या, "काळाच्या ओघात रंगभूमीवरची स्थिती बदलली आहे. रंगभूमीवर सध्या जे काम करत आहेत, ते माझ्या नातवंडांच्या वयाचे आहेत. कलेविषयी माझ्या असलेल्या श्रद्धा, त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात असे वाटते, म्हणून ही कार्यशाळा". या शाळेच्या निमित्ताने, नाट्यक्षेत्रात कारकिर्दीच्या मध्यावर असलेल्या रंगकर्मींना नवे धडे देण्यास 'बाई' नव्याने सरसावल्या होत्या आणि मराठी नाट्यसृष्टीत त्यावेळी ही महत्त्वाची घटना ठरली होती.

Comments
Add Comment

संवेदनशील आठवणींची 'पंढरीची वारी'

राजरंग-राज चिंचणकर पंढरीच्या रायाशी संबंधित अनेक कलाकृती विविध माध्यमांतून आतापर्यंत सादर झाल्या आहेत. रूपेरी

आषाढीच्या महिन्यात पंढरपूर अप्रतिम

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  सावळ्याची जणू सावली’ या झी मराठी चॅनेलच्या मालिकेतील सावलीची भूमिका साकारून

शेंगा, रानभाजी आणि बरंच काही...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद  काही वर्षांपूर्वी गजेंद्र अहिरेंचं शेवग्याच्या शेंगा नावाचं, संजय मोने आणि स्वाती

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती

  टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल    मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामध्ये अश्वत्थामाचा ज्वलंत जीवनपट

एका रंगकर्मीची 'विठ्ठल वारी'...

राजरंग-राज चिंचणकर   पंढरीच्या वारीत असंख्य वारकरी सामील होत आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन होतात. या

उजळमाथ्याने फिरणाऱ्या प्रत्येक गॉसिपकारास...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद   नाटक उजळवणाऱ्या प्रत्येक प्रकाशयोजनाकारास मी नेहमी पहिलं वाक्य ऐकवतो, "रिस्पेक्ट