१५ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार- अण्णा बनसोडे-विधानसभा उपाध्यक्ष
मुंबई, दि. ३ जुलै : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी पवना धरण–निगडी जलशुद्धीकरण केंद्र थेट जलवाहिनी प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक पावले उचलली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत प्रकल्पाच्या प्रशासकीय, तांत्रिक, आर्थिक आणि कायदेशीर बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाय काढण्यात येणा मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणामुळे ...
बैठकीनंतर विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, पुढील आठवड्यात शेतकरी व विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व संबंधितांची मते जाणून घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करून तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर समन्वयाने कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
कॅनडातील क्यूबेक प्रांतांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट मुंबई : महाराष्ट्र आणि कॅनडातील क्यूबेक प्रांत यांच्यात विविध ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार श्रीरंग बारणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, आमदार सुनील शेळके, माजी आमदार बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवडचे महापौर, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तसेच नगरविकास, जलसंपदा, महसूल, रेल्वे, एमएसआरडीसी, महावितरण, पीएमआरडीए आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पवना–निगडी थेट जलवाहिनी प्रकल्पाला नव्याने गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, पिंपरी-चिंचवडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली आहे.





