Thursday, July 2, 2026

Ketan Agrawal Murder Case: धक्कादायक! केतनला ढकलण्यासाठी सियाने केला होता सराव; पोलिसांच्या हाती लागले सर्वात मोठे पुरावे!

Ketan Agrawal Murder Case: धक्कादायक!  केतनला ढकलण्यासाठी सियाने केला होता सराव; पोलिसांच्या हाती लागले सर्वात मोठे पुरावे!

सिया गोयलच्या घरी पोलिसांचा पंचनामा, घटनेतील कपडे जप्त

पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal Murder Case) हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पुणे ग्रामीण पोलिसांकडून विविध पुरावे गोळा केले जात आहेत. या तपासाचा भाग म्हणून मुख्य आरोपी सिया गोयल हिला बुधवारी पुण्यातील विविध ठिकाणी नेऊन पंचनामा करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सियाला तिच्या राहत्या घरी नेऊन तपास केला. यावेळी घटनेच्या दिवशी तिने परिधान केलेले कपडे जप्त करण्यात आले. तसेच मोबाईल आणि इतर काही वस्तूंचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Siya Goyal)

तपासादरम्यान पोलिसांनी सियाला पुण्यातील लुलानगर परिसरातही नेले. तपास यंत्रणेला संशय आहे की, याच परिसरातील एका टेकडीवर सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला कड्यावरून ढकलण्याचा सराव केला होता. या संशयित ठिकाणी पोलिसांनी आरोपीच्या उपस्थितीत पंचनामा केला. (Murder Case)

याशिवाय, घटनेपूर्वी आणि घटनेनंतर सिया ज्या ठिकाणी गेली होती, त्या सर्व ठिकाणांचीही तपासणी करण्यात आली. या ठिकाणांवरील हालचालींची माहिती आणि इतर पुरावे पोलिसांकडून पडताळले जात आहेत.

पोलिसांचा तपास आता या दिशेनेही सुरू आहे की, १८ जून रोजी घटना घडल्यानंतर सियाने कोणतेही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता का. त्यासाठी तिच्या घरातील वस्तू आणि इतर पुराव्यांची तपासणी करण्यात आली.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, पोलिसांकडून वैज्ञानिक पुरावे, डिजिटल माहिती आणि घटनास्थळावरील तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >