Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली  आहे. महामार्ग जेवढा सोईस्कर आणि सुखकर आहे तेवढाच जास्त तो घातक ठरत आहे. गेल्या आठवडाभरात विविध जिल्ह्यात झालेल्या अपघातात अनेक  प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील अपघातांच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. अशातच आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर(Samruddhi Mahamarg) भीषण अपघातझाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.



कसा झाला अपघात ?


अमरावती(Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर एक चार चाकी वॅगनार कार आणि ट्रक यांच्यात मोठी धडक झाली. चंद्रपूरहून मुंबईच्या(Chandrapur-mumbai)) दिशेने निघालेल्या वॅगनार कारने पुढे जात असलेल्या भरधाव ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुरा झाला असून कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. चैनल क्रमांक १०५ जवळ हा भीषण अपघात झाला.



एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू


या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या पाचही जणांचा एकाच कुटुंबाशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तसेच समृद्धी महामार्गावरील बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्व मृतदेहांना बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या अपघाताबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.


वाहतूक मंदावली


या भीषण अपघातानंतर समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतूककोंडीची परिस्थिती निर्माण झाली. अपघातग्रस्त वाहन आणि ट्रक यामुळे वाहतूक विस्कळीत  झाली मात्र वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आवश्यक कार्यवाही सुरू केली. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीतपणे सुरु झाली.

Comments
Add Comment

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला ग्रहणाचा सावट नाही, पण सकाळचा मुहूर्त चुकला ? जाणून घ्या दुपारी राखी कधी बांधायची!

आज २८ ऑगस्ट रोजी देशभरात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा 'रक्षाबंधन' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी