इंग्लंड खेळाडूंकडून मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर'
लंडन : टी-२० महिला वर्ल्ड कप २०२६ मध्ये शनिवारी (२७ जून) ला गविजेता न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात उपांत्या फेरीच्या दृष्टीने महत्त्वाची लढत झाली. या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा ९ गडी राखून पराभव केला. या निकालामुळे न्यूझीलंड संघाला दुहेरी धक्का बसला, कारण सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स आणि लिआ ताहुहू या तीन अनुभवी खेळाडूंनी टी२० आंतरराष्ट्रीय (T20 International) सामन्यांमधून निवृत्ती घेतली. सामन्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले.
पुणे : पुण्यातील (Pune) उद्योजक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात महत्त्वाचे पाऊल उचलले ...
सामना संपल्यांनतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी तिन्ही दिग्गजांना गार्ड ऑफ ऑनर देत सन्मानपूर्वक निरोप दिला. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच जाहिर केले होते की, सोफी डिव्हाईन (Sophie Devine), सुझी बेट्स (Suzie Bates) आणि लिया ताहुहू (Lia Tahuhu) यांच्यासाठी २०२६ महिला वर्ल्ड कप दहा अखेरचा वर्ल्ड कप असणार आहे. या तिन्हीही खेळाडुंनी अनेक वर्षे न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटला जगातिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. सूझी बेट्स न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू म्हणून निवृत्त होत आहे. बेट्सने तिच्या ३७० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विक्रमी १०,७२१ धावा केल्या, जो एक विशेष विक्रम आहे. सोफी डिव्हाइनने आपल्या २० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत न्यूझीलंडसाठी ३१७ सामने खेळले. या दरम्यान तिने वनडे सामन्यांमध्ये ४२७९ धावा आणि टी२० मध्ये ३८१७ धावा केल्या. त्याचबरोबर तिने २४१ विकेट्सही घेतल्या. त्यामुळे ती सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे.
तुमकुरु, कर्नाटक: प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक आणि भीषण घटना समोर आली आहे. ब्रेकअपनंतर प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून एका ३० वर्षीय ...
व्हिडीओ व्हायरल इंग्लंड खेळाडू आणि सहकारी या तिघांही गार्ड ऑफ ऑनर दिल्याने सुझी बेट्स आणि लिया ताहुहू यांच्या डोळ्यांत अश्रू आले. या तिघींचा निरोप समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोफी डिव्हाईनची स्फोटक फलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरी, सुझी बेट्सची सातत्यपूर्ण फलंदाजी आणि लिया ताहुहूची वेगवान गोलंदाजी यामुळे न्यूझीलंड महिला संघाने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. या तिघींच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.View this post on Instagram






