Pune News : पुणे स्थानकातून प्रवाशांची अजब हातसफाई : ५ वर्षांत ३ कोटींचे बेडशीट अन् टॉवेल लंपास; रेल्वेने ठेकेदाराकडून वसूल केली भरपाई!

पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यातून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून चादर, उशी, ब्लँकेट आणि टॉवेलचा संच (बेडरोल) दिला जातो. मात्र, पुण्यातून प्रवास करणारे काही नागरिक या सुविधेचा गैरफायदा घेत हे साहित्य थेट आपल्या बॅगेत भरून घरी घेऊन जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुणे रेल्वे विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत तब्बल २ लाख ६ हजार ४८३ इतक्या बेडरोल वस्तू गहाळ किंवा चोरीला गेल्या आहेत. या चोरीला गेलेल्या साहित्याची एकूण किंमत जवळपास ३ कोटी रुपयांच्या घरात आहे.



ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड


प्रवाशांच्या या अजब चोरीच्या प्रवृत्तीमुळे थेट रेल्वेचे आर्थिक नुकसान होत नाही, कारण रेल्वे नियमांनुसार ही संपूर्ण वसुली कंत्राटदाराकडून केली जाते. पुणे स्थानकातून दररोज साधारण ३० गाड्यांना बेडरोल किट पुरवले जाते. प्रवासाचे शेवटचे स्थानक येण्यापूर्वी अर्धा तास आधी हे साहित्य जमा करण्याची जबाबदारी ठेकेदार आणि त्याच्या कर्मचाऱ्यांची असते. मात्र, रात्रीच्या वेळी प्रवाशांची उतरताना होणारी घाईगडबड पाहून अनेकजण हे साहित्य लंपास करतात. अंतिमतः गाड्यांच्या शेवटच्या थांब्यावर साहित्याची मोजणी होते, आणि कमी भरलेल्या साहित्याचे बाजारमूल्य थेट ठेकेदाराच्या बिलातून कापले जाते. नंतर कंत्राटदार ही रक्कम संबंधित डब्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल करतात, ज्यामुळे निष्पाप कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसतो.



रेल्वेकडून २.८१ कोटींची वसुली


पुणे रेल्वे विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना स्वच्छ आणि निर्जंतुक बेडरोल पुरवण्याचे कंत्राट खासगी संस्थांना दिले जाते. गेल्या पाच वर्षांत गहाळ झालेल्या या सर्व वस्तूंचे ऑडिट करण्यात आले आहे. त्या आधारे रेल्वेने आपले नुकसान भरून काढत ठेकेदाराच्या बिलातून आणि अनामत रकमेतून २ कोटी ८१ लाख ७६ हजार ८९ रुपये इतकी रक्कम वसूल केली आहे. ही सार्वजनिक मालमत्ता असून प्रवाशांनी जबाबदारीने वागून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



गेल्या ५ वर्षांत चोरीला गेलेल्या वस्तूंची आकडेवारी


चादरी (बेडशीट) : ६३,५४९


उशीचे कव्हर : ५९,०६३


फेस टॉवेल : ५७,२०२


ब्लँकेट : १५,०४३


उशी : ११,६२६

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा