School Student Accident : काळीज पिळवटून टाकणारा अपघात! बस मधून उतरली अन् रस्ता ओलांडताच भीषण घडलं

भरधाव दुचाकीची शाळकरी मुलीला जोरदार धडक


School Student Accident : बीड: बीड (Beed) जिल्ह्यातील गया नगर परिसरात शाळेतून घरी परतणाऱ्या एका ९ वर्षीय विद्यार्थिनीला भरधाव दुचाकीने धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात (Accident) मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


माहितीनुसार, अभिज्ञा मडीवाले ही इयत्ता दुसरीत शिकणारी विद्यार्थिनी शाळेच्या बसमधून उतरून रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी वेगाने आलेल्या दुचाकीने तिला जोरदार धडक दिली. धडकेनंतर मुलगी रस्त्यावर कोसळली.



घटनेनंतर दुचाकीस्वार न थांबता तेथून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. अपघात पाहताच परिसरातील नागरिक आणि शाळेच्या बसमधील कर्मचारी तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी जखमी मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.


घटनेची माहिती मिळताच जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधर आणि त्यांचे पथक रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी घटनेची माहिती घेत पुढील तपास सुरू केला आहे.


या घटनेनंतर पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी शाळा बसमधून उतरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची जबाबदारी बस चालक आणि कर्मचाऱ्यांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळांना सूचना देण्यात येणार असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच शाळा व्यवस्थापनासोबत वाहतूक सुरक्षेबाबत बैठकही घेण्यात येणार आहे.



या अपघातानंतर शाळा बस थांब्यांजवळील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत जखमी मुलगी लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.


Comments
Add Comment

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला ग्रहणाचा सावट नाही, पण सकाळचा मुहूर्त चुकला ? जाणून घ्या दुपारी राखी कधी बांधायची!

आज २८ ऑगस्ट रोजी देशभरात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा 'रक्षाबंधन' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी