Secretary Kiran Pawaskar : उद्धव ठाकरेंनी “माफी दौरा” काढावा”

मुलाचे करियर वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंची धावपळ सुरू


शिवसेना सचिव किरण पावसकर यांची खरमरीत टीका












मुंबई  :
शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांत जाऊन मतदारांची माफी मागण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले आहेत, मात्र मतदारांची माफी मागण्याचा हा दौरा नसून मुलाचे करियर वाचवण्यासाठीचा दौरा असल्याची खरमरीत टीका शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पावसकर म्हणाले की, आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे विदर्भात गेले आहेत, मात्र नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत उबाठा नेतृत्व बांद्रा बाहेर पडले नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना वाऱ्यावर सोडले होते. उबाठाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊनच खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या मतदार संघात जाऊन आज मतदारांनी माफी मागण्याचा उबाठाचा प्रयत्न आहेत. मात्र त्यांनी यापूर्वीच दौरा का केला नाही, असा प्रश्न तेथील कार्यकर्ते, पदाधिकारी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख उबाठाला विचारतील. मतदारांची माफी नाही तर मुलाची राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठी उबाठा दौरा करत आहेत, अशी टीका पावसकर यांनी केली.(The Government of India) 





पावसकर पुढे म्हणाले की, वरळीसारख्या सुरक्षित मतदार संघातून मुलाला निवडून आणण्यासाठी उबाठाला दोन आमदारांचा पत्ता कापावा लागला. आमदार सुनील शिंदे आणि आमदार सचिन अहिर यांना विधान परिषदेवर उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे लागले. त्यामुळे आताही मुलाच्या करियरसाठी उबाठा विदर्भाच्या दौऱ्यावर गेले आहेत, असे पावसकर म्हणाले. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ६५ नगरसेवक शिवसेनेत आले. उबाठातून ४० आमदार शिवसेनेत (40 MLAs in Shiv Sena )गेले त्याचे ६० आमदार झाले. आज सहा खासदार गेले उद्या त्याचे १२ होतील, असे पावसकर म्हणाले.आमदार फोडले, खासदार फोडले, नगर सेवक फोडले या आरोपांना काही महत्व उरलेले नाही. हे सर्व लोकप्रतिनिधी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी शिवसेनेत का प्रवेश करतात, याचे आत्मपरिक्षण उबाठाने करायला हवे. आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी हे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत, याच कारण शिंदे यांचे नेतृत्व तळागाळातून जाऊन काम करतेय, घरात बसून काम करत नाही, असा टोला पावसकर यांनी लगावला. भविष्यातील पक्ष प्रवेशांबाबत लवकरच मोठी बातमी कळेल, असेही पावसकर यावेळी म्हणाले
Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी