‘सुभेदारांच्या गेस्ट हाऊस’ची मुंबई वारी...

राजरंग-राज चिंचणकर




मराठी रंगभूमीवर सध्या सुरू असलेले 'सुभेदार गेस्ट हाऊस' हे नाटक, गेले काही दिवस रंगभूमीवरून गायब झाल्याचे मुंबईकर नाट्यरसिकांना जाणवत होते. साहजिकच, या नाटकाची चर्चा मुंबईतल्या नाट्यकट्ट्यांवर रंगली होती. मात्र आता त्यामागचे कारण उघड झाले आहे आणि ते म्हणजे गेले काही दिवस हे नाटक पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, कराड, पुणे आदी ठिकाणी या नाटकाने यशस्वी प्रयोग केल्यानंतर, आता सुभेदारांचे हे गेस्ट हाऊस पुन्हा एकदा मुंबईची वारी करण्यास सज्ज झाले आहे. 'मर्डर मिस्ट्री' या लेखन प्रकारात हातखंडा असलेल्या अगाथा ख्रिस्ती यांच्या 'माऊस ट्रॅप' या लोकप्रिय नाटकावर 'सुभेदार गेस्ट हाऊस' हे नाटक आधारित आहे. 'माऊस ट्रॅप' या नाटकाने त्याचे मराठीकरण होताना पूर्णतः मराठी बाज स्वीकारला असल्याने, मराठमोळ्या रसिकांना हे नाटक 'अपील' होत आहे. या नाटकाचे लेखन शिरीष देखणे आणि या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे असून, नाटकाला अजित परब यांनी संगीत दिले आहे. शीतल तळपदे यांनी नाटकाची प्रकाशयोजना केली आहे.





महाराष्ट्र दौऱ्याच्या दरम्यान काही ठिकाणी या नाटकाने 'हाऊसफुल्ल'चा बोर्ड झळकावला. विशेष म्हणजे, या नाटकात शंतनू मोघे, सौरभ गोखले, अंगद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, आनंद पाटील, सना कुलकर्णी, रोहित देशमुख हे सध्याचे आघाडीचे कलावंत आहेत. साहजिकच, पश्चिम महाराष्ट्रातल्या त्यांच्या चाहत्यांनी या नाटकाला उत्तम प्रतिसाद देत, या कलाकारांचा उत्साह वाढवला आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना या नाटकाने रसिकजनांना मनोरंजनाची मेजवानी दिली आहे. ही सगळी भटकंती करून आता हे नाटक पुन्हा एकदा मुंबईत दाखल झाले आहे. दौऱ्यानंतरचा या नाटकाचा मुंबईतला प्रयोग २८ जून रोजी श्री शिवाजी मंदिरात होत आहे. आतापर्यंत अनेक लोकप्रिय नाटके रंगभूमीवर आणणाऱ्या 'धि गोवा हिंदू असोसिएशन' या संस्थेने हे नाटक रंगभूमीवर आणले असून, बऱ्याच कालावधीनंतर ही संस्था पुन्हा नाट्यनिर्मितीत उतरली आहे. 'सुकल्प चित्र' या संस्थेची त्यांना साथ लाभली आहे. एकूणच, 'सुभेदार गेस्ट हाऊस' हे नाटक आता मुंबईकर रसिकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे.

Comments
Add Comment

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती

  टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल    मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामध्ये अश्वत्थामाचा ज्वलंत जीवनपट

एका रंगकर्मीची 'विठ्ठल वारी'...

राजरंग-राज चिंचणकर   पंढरीच्या वारीत असंख्य वारकरी सामील होत आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन होतात. या

उजळमाथ्याने फिरणाऱ्या प्रत्येक गॉसिपकारास...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद   नाटक उजळवणाऱ्या प्रत्येक प्रकाशयोजनाकारास मी नेहमी पहिलं वाक्य ऐकवतो, "रिस्पेक्ट

भारतातील पहिले एआय-आधारित तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ सुरू

देशातील लाइव्ह मनोरंजन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित पहिले डिस्कव्हरी आणि तिकीट बुकिंग

रंगभूमी आणि बदलता विनोद...

मराठी नाट्यक्षेत्रात सुरू झालेला 'नाट्य निरंतर' हा उपक्रम अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येत

आसमंताच्या रंगमंचावरचे 'आषाढ नाट्य'

राजरंग-राज चिंचणकर आषाढ महिन्याची चाहूल लागली की कवी कुलगुरू कालिदासाने 'मेघदूत' या महाकाव्यात वर्णन केलेल्या