लंडन : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता केवळ लेखन, फोटो किंवा तांत्रिक कामांपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता AI ने न्यायालयीन व्यवस्थेतही इतिहास रचला आहे. ब्रिटनमध्ये 'गारफिल्ड AI' (Garfield AI) या AI-आधारित कायदेशीर प्रणालीने मानवी वकिलाविरोधातील न्यायालयीन खटल्यात विजय मिळवत जगातील पहिली अशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. (AI works wonders in court)
या प्रकरणात फ्रीलान्स मानव संसाधन (HR) अधिकारी टॅमिरेस कॅमेल टॅक्विडीर यांचे प्रतिनिधित्व गारफिल्ड AI ने केले. एका हॉस्पिटॅलिटी कंपनीकडून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या ७००० पाउंड (सुमारे ८.७९ लाख रुपये) किमतीच्या 'स्मॉल क्लेम्स कोर्ट'मधील दाव्यात AI ने क्लायंटला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी क्लायंटने केवळ ४०० पाउंड (सुमारे ५० हजार रुपये) इतकेच शुल्क भरले. (AI works wonders in court)
सामान्यतः अशा प्रकरणांसाठी पारंपरिक वकिलांवर मोठा खर्च करावा लागतो. मात्र गारफिल्ड AI ने कमी खर्चात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया हाताळत क्लायंटचे लाखो रुपये वाचवले. त्यामुळे कायदेशीर क्षेत्रात AI च्या वापराबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. (AI works wonders in court)
बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. शहरातील सर्वात उंच ...
लंडनमधील वँड्सवर्थ काउंटी कोर्टात जवळपास तीन तास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. खटल्यापूर्वी गारफिल्ड AI ने 'वन एसेक्स कोर्ट'चे कनिष्ठ बॅरिस्टर डॉमिनिक ली यांची नियुक्ती केली होती. अखेर न्यायालयाने AI ने तयार केलेल्या बाजूला मान्यता देत विरोधी पक्षाचा दावा फेटाळला आणि क्लायंटच्या बाजूने निकाल दिला. (AI works wonders in court)
विजयानंतर बॅरिस्टर डॉमिनिक ली यांनी AI ने तयार केलेली कागदपत्रे अत्यंत सविस्तर, अचूक आणि प्रभावी असल्याचे सांगितले. त्यांनी या प्रकरणातील तयारीचे विशेष कौतुक केले. गारफिल्ड AI लॉ फर्मचे सहसंस्थापक फिलिप यंग यांनी लिंक्डइनवरील पोस्टद्वारे या ऐतिहासिक विजयाची माहिती दिली. त्यांच्या मते, मानवी सॉलिसिटर्सविरुद्ध AI आधारित कायदेशीर प्रणालीने न्यायालयीन खटला जिंकण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. (AI works wonders in court)
सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि नेपाळ यांच्यातील व्यापारी संबंधांवर ...
गारफिल्ड AI म्हणजे काय?
गारफिल्ड AI ही AI-आधारित कायदेशीर सेवा देणारी संस्था असून ब्रिटनमध्ये केवळ AI च्या माध्यमातून कायदेशीर सेवा देण्यासाठी अधिकृत मान्यता मिळालेली पहिली लॉ फर्म असल्याचा दावा केला जातो. ही संस्था कायदेशीर कागदपत्रे तयार करणे, दावे दाखल करणे आणि १०,००० पाउंड (सुमारे १२.५ लाख रुपये) पर्यंतच्या 'स्मॉल क्लेम्स कोर्ट'मधील प्रकरणांमध्ये ग्राहकांना मदत करते. (AI works wonders in court)
नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा इबोला विषाणू (Ebola Virus) चिंतेचा विषय ठरत आहे. काँगो (Congo) आणि युगांडा (Uganda) येथे उद्रेक झाल्यानंतर आता फ्रान्समध्ये (France) इबोलाचा ...
या ऐतिहासिक प्रकरणात AI ने क्लायंटची संपूर्ण केस स्वतः तयार केली. कायदेशीर दस्तऐवज तयार करण्यापासून ते चार साक्षीदारांचे जबाब, पुरावे संकलित करणे आणि न्यायालयात बाजू मांडण्यासाठी बॅरिस्टरची नियुक्ती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया AI च्या मदतीने पार पडली. त्यामुळे भविष्यात न्यायव्यवस्थेत AI ची भूमिका किती महत्त्वाची ठरू शकते, याची ही मोठी झलक मानली जात आहे. (AI works wonders in court)




