कॅराकस : व्हेनेझुएलात बुधवारी ४० सेकंदांच्या अंतराने दोन मोठे भूकंप झाले. पहिला भूकंप ७.२ रिश्टर क्षमतेचा तर दुसरा भूकंप ७.५ रिश्टरचा होता. या दोन दोन भूकंपांमुळे व्हेनेझुएलात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार व्हेनेझुएलात आलेल्या दोन भूकंपांमुळे २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. कॅराकस आणि किनारपट्टीच्या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाताहात झाल्याचे चित्र आहे. कोसळलेल्या तसेच पडझड झालेल्या इमारतींची संख्या मोठी आहे. अनेक रस्त्यांची वाताहात झाली आहे. वीज आणि पाणी पुरवठ्याचा पुरता बोजवारा उडाला आहे.
भूकंपानंतर जगभरातून व्हेनेझुएलात येऊ लागला मदतीचा ओघ . . .#prahaarnewsline #MarathiNews #venezula #earthquake #supportvennzula pic.twitter.com/C8qCK5wAEy
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) June 26, 2026
व्हेनेझुएला (Venezuela) आणि जपान (Japan) या दोन देशांना बुधवारी (२४ जून) शक्तिशाली भूकंपांचे (Earthquake) धक्के बसले. व्हेनेझुएलामध्ये अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने ७.२ ...
मदतकार्य सुरू आहे. पण प्रतिकूल परिस्थितीमुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. जगभरातून व्हेनेझुएलाकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकेतील देशात भूकंपामुळे झालेली ही एका शतकाहून अधिक काळातली सर्वात मोठी हानी आहे. अजूनही व्हेनेझुएलामध्ये भूकंपाचे लहान धक्के बसत आहेत. यामुळे पडझड झालेल्या इमारतींमध्ये कोणीही जाऊ नये, अशी सूचना प्रशासनाने नागरिकांना दिली आहे.
भूकंपामुळे व्हेनेझुएलात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी . . .#prahaarnewsline #MarathiNews #venezula #earthqauke #rescueoperation #propertyloss #disaster pic.twitter.com/D9BEOVx3dA
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) June 26, 2026
नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा इबोला विषाणू (Ebola Virus) चिंतेचा विषय ठरत आहे. काँगो (Congo) आणि युगांडा (Uganda) येथे उद्रेक झाल्यानंतर आता फ्रान्समध्ये (France) इबोलाचा ...
व्हेनेझुएलात मागील काही तासांमध्ये आलेल्या अनेक भूकंपांचा केंद्रबिंदू कॅराकसपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. या भूकंपांमुळे घनदाट लोकवस्तीच्या कॅराकस शहराची तसेच आसपासच्या भागांची प्रचंड हानी झाली आहे. मागील अनेक वर्षात भूकंपच आला नव्हता, त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा या संकटाला सामोरी जाण्यासाठी सज्ज नव्हती. भूकंप आल्यावर सर्वांचीच धावपळ झाली. सध्या सरकारी यंत्रणा आणि खासगी कंपन्यांच्या सहकार्याने मदतकार्य सुरू आहे. ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे.
...अशा प्रकारे बचावपथकाने महिलेला वाचवले . . .#prahaarnewsline #MarathiNews #venezula #earthqauke #rescueoperation pic.twitter.com/37LLkYPbnH
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) June 26, 2026
३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य करारामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याची ...
सरकार संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी तसेच अडचणीत सापडलेल्या कंपन्यांना सावरण्यासाठी आर्थिक मदत देण्याची तयारी करत आहेत. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असे व्हेनेझुएलाच्या सरकारमधील सूत्रांनी सांगितले. ज्या शहरांना भूकंपाचा धक्का बसला आहे तिथल्या पायाभूत सुविधांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. बांधकामांची मजबुती तपासली जाणार आहे.



