सप्त पुरस्कारांची शिदोरी...

प्रयोगिक रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकांच्या मागे कुणी व्यक्ती भक्कमपणे उभी असण्याची शक्यता तशी कमी असते. स्वतःच्या इच्छा- आकांक्षा यांच्या बळावर आणि स्वतःचाच खिसा मोकळा करत बहुतेक प्रायोगिक नाटके रंगभूमीवर उभी राहतात. काही महत्त्वाचे विषय हाती घेत, काहीतरी ठोस सांगू पाहणाऱ्या या प्रयोगशील नाटकांच्या टीमला रसिकांचा प्रतिसाद अपेक्षित असतो. अनेकदा तर, या नाटकांना रसिकांची उपस्थिती कमी असली तरी हाती घेतलेले कार्य नेटाने करत राहणे, असा वसा या नाटकमंडळींनी घेतलेला दिसतो. हा सगळा प्रवास करत असताना, नाटकाच्या ओंजळीत काही पुरस्कार आले की या मंडळींचा हुरूप अर्थातच वाढतो.



याच मांदियाळीत, 'महोगाथा' या प्रायोगिक नाटकाची टीम सध्या अभिमानाचे क्षण अनुभवत आहे आणि यासाठी निमित्त ठरली आहे, ती 'नटश्रेष्ठ शरद तळवलकर स्मृती करंडक २०२६' ही स्पर्धा! अलीकडेच पार पडलेल्या या स्पर्धेत या नाटकाने एकूण ७ पुरस्कारांवर नाव कोरले आहे. 'विजय पटवर्धन फाऊंडेशन' या संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 'महोगाथा' नाटकाने सांघिक तृतीय क्रमांक पटकावला असून, 'अतुल परचुरे स्मृती करंडक' प्राप्त केला आहे. या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे तृतीय पारितोषिक हृदयनाथ जाधव व सावित्री मेधातुल, दिग्दर्शनाचे तृतीय पारितोषिक मंगेश सातपुते, प्रकाशयोजनेचे द्वितीय पारितोिषक विलास हुमणे, संगीताचे तृतीय पारितोषिक विक्रम होता आणि विशेष लक्षवेधी लेखनाचे पारितोषिक सावित्री मेधातुल यांना मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर, या नाटकाच्या टीमसोबत संवाद साधला असता ही मंडळी म्हणतात, "आमच्या संपूर्ण टीमच्या कष्टाला मिळालेली ही अत्यंत मोठी पोहोचपावती आहे. आम्हाला सतत प्रोत्साहन देणाऱ्या सर्व रसिकांचे आम्ही मनापासून ऋणी आहोत. 'महोगाथा'चा हा प्रवास इथेच थांबणार नाही; तर या पुरस्कारांच्या ऊर्जेने तो आता अधिक आत्मविश्वासाने पुढे सुरू राहील. रंगमंचावर घाम गाळणाऱ्या कलाकारांपासून ते पडद्यामागे राबणाऱ्या आमच्या तांत्रिक टीमपर्यंत प्रत्येकाच्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे यश आहे."

Comments
Add Comment

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती

  टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल    मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामध्ये अश्वत्थामाचा ज्वलंत जीवनपट

एका रंगकर्मीची 'विठ्ठल वारी'...

राजरंग-राज चिंचणकर   पंढरीच्या वारीत असंख्य वारकरी सामील होत आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन होतात. या

उजळमाथ्याने फिरणाऱ्या प्रत्येक गॉसिपकारास...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद   नाटक उजळवणाऱ्या प्रत्येक प्रकाशयोजनाकारास मी नेहमी पहिलं वाक्य ऐकवतो, "रिस्पेक्ट

भारतातील पहिले एआय-आधारित तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ सुरू

देशातील लाइव्ह मनोरंजन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित पहिले डिस्कव्हरी आणि तिकीट बुकिंग

रंगभूमी आणि बदलता विनोद...

मराठी नाट्यक्षेत्रात सुरू झालेला 'नाट्य निरंतर' हा उपक्रम अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येत

आसमंताच्या रंगमंचावरचे 'आषाढ नाट्य'

राजरंग-राज चिंचणकर आषाढ महिन्याची चाहूल लागली की कवी कुलगुरू कालिदासाने 'मेघदूत' या महाकाव्यात वर्णन केलेल्या