Venezuela Earthquakes : व्हेनेझुएलात आलेल्या दोन भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी, भूकंपानंतरचे भयावह फोटो, व्हिडीओ होऊ लागले व्हायरल

कॅराकस : व्हेनेझुएलात बुधवारी ४० सेकंदांच्या अंतराने दोन मोठे भूकंप झाले. पहिला भूकंप ७.२ रिश्टर क्षमतेचा तर दुसरा भूकंप ७.५ रिश्टरचा होता. या दोन दोन भूकंपांमुळे व्हेनेझुएलात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार व्हेनेझुएलात आलेल्या दोन भूकंपांमुळे २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. कॅराकस आणि किनारपट्टीच्या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाताहात झाल्याचे चित्र आहे. कोसळलेल्या तसेच पडझड झालेल्या इमारतींची संख्या मोठी आहे. अनेक रस्त्यांची वाताहात झाली आहे. वीज आणि पाणी पुरवठ्याचा पुरता बोजवारा उडाला आहे.






मदतकार्य सुरू आहे. पण प्रतिकूल परिस्थितीमुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. जगभरातून व्हेनेझुएलाकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.


व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकेतील देशात भूकंपामुळे झालेली ही एका शतकाहून अधिक काळातली सर्वात मोठी हानी आहे. अजूनही व्हेनेझुएलामध्ये भूकंपाचे लहान धक्के बसत आहेत. यामुळे पडझड झालेल्या इमारतींमध्ये कोणीही जाऊ नये, अशी सूचना प्रशासनाने नागरिकांना दिली आहे.






व्हेनेझुएलात मागील काही तासांमध्ये आलेल्या अनेक भूकंपांचा केंद्रबिंदू कॅराकसपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. या भूकंपांमुळे घनदाट लोकवस्तीच्या कॅराकस शहराची तसेच आसपासच्या भागांची प्रचंड हानी झाली आहे. मागील अनेक वर्षात भूकंपच आला नव्हता, त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा या संकटाला सामोरी जाण्यासाठी सज्ज नव्हती. भूकंप आल्यावर सर्वांचीच धावपळ झाली. सध्या सरकारी यंत्रणा आणि खासगी कंपन्यांच्या सहकार्याने मदतकार्य सुरू आहे. ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे.






सरकार संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी तसेच अडचणीत सापडलेल्या कंपन्यांना सावरण्यासाठी आर्थिक मदत देण्याची तयारी करत आहेत. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असे व्हेनेझुएलाच्या सरकारमधील सूत्रांनी सांगितले. ज्या शहरांना भूकंपाचा धक्का बसला आहे तिथल्या पायाभूत सुविधांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. बांधकामांची मजबुती तपासली जाणार आहे.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

Donald Trump : ट्रम्प प्रशासनाकडून इराणला मदत करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर निर्बंध

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

US Immigration News : अमेरिकेत मोठा भूकंप! ट्रम्प सरकारचा दणका, 2 लाख परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 2 लाख परदेशी नागरिकांचे B1 आणि B2 व्हिसा रद्द करण्याच्या तयारीत

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात आणि सुरक्षेत सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK)

Hindu family murdered in Bangladesh : बांगलादेशात हिंदू कुटुंबातील चौघांची हत्या; याबा सेवनाला विरोध केल्याचा पोलिसांचा दावा, दोन्ही आरोपींचा कबुलीजबाब

रंगपूर : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. माचुआपारा