Trimbakeshwar : पेड दर्शन घोटाळा प्रकरणात पुरुषोत्तम कडलगला दिलासा, अडीच महिन्यांनी जामीन मंजूर

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर येथील पेड दर्शन घोटाळ्यातील (Trimbakeshwar Paid Darshan Scam) मुख्य संशयित पुरुषोत्तम कडलग (Purushottam Kadlag) याला अखेर अडीच महिन्यांनी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. गुरुवारी (दि. २५) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने काही अटी व शर्ती घालत कडलगला दिलासा दिला. दरम्यान, या घोटाळ्यातील उर्वरित चार संशयित मात्र अद्यापही तुरुंगातच आहेत.




नेमकं प्रकरण काय ?


त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) 'व्हीआयपी' दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. 11 एप्रिल रोजी नाशिकच्या पंचवटी भागातील भाविक अनंता सुरेश मेहंदळे आणि त्यांचे मित्र दर्शनासाठी आले होते. त्यांनी 200 रुपयांचा अधिकृत देणगी पास घेतला होता, मात्र रांगेत उभे असताना संशयितांनी त्यांना गाठले. "रांगेतून दर्शनाला 4-5 तास लागतील, आम्ही 10 मिनिटांत दर्शन घडवून देतो," असे आमिष दाखवून संशयितांनी या भाविकांकडून 3 हजार रुपये रोख स्वीकारले. देवस्थान ट्रस्टची कोणतीही अधिकृत 'पेड दर्शन' सुविधा नसतानाही, भाविकांना आत सोडून त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अनंता मेहंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) फिर्याद दाखल केली.




उच्च न्यायालयाकडून दिलासा


या प्रकरणात पोलिसांनी (Trimbakeshwar Police )सर्वात आधी गोटीराम मनाजी पेहरे (Gotiram Manaji Pehre) आणि अभिषेक कडलग (Abhishek Kadlag) (पुरुषोत्तम कडलगचा पुतण्या) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान या संपूर्ण रॅकेटमध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलगचा (Purushottam Kadlag) सहभाग असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले, त्यानंतर पुरुषोत्तम कडलगला अटक करण्यात आली होती. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police ) १४ एप्रिल रोजी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर तपासाची व्याप्ती पाहता पोलिसांच्या मागणीनुसार जिल्हा न्यायालयाने (Nashik District Court)  त्याला तीन वेळा पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) करण्यात आली होती.



यादरम्यान कडलगने जिल्हा न्यायालयात (Nashik District Court) अनेकदा जामिनासाठी अर्ज केले, मात्र न्यायालयाने त्याचे सर्व अर्ज फेटाळून लावले होते. जिल्हा न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने अखेर कडलगने वकिलामार्फत उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती. यावर गुरुवारी (दि. २५) उच्च न्यायालयात (High Court) अंतिम सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद् ऐकल्यानंतर न्यायालयाने पुरुषोत्तम कडलग याला सशर्त जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे