Nashik : नाशिकला गुन्हेगारीचं ग्रहण ? जुन्या वादातून पुन्हा एका युवकाचा खून ; संशयित ताब्यात

Nashik Crime News : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तपोवन (Tapovan)  येथे सुटकेसमधील आढळलेला महिलेचा मृतदेह त्यानंतर कामगार कॉलनीतील घराच्या टेरेसवर गोणीत भरलेला २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह या दोन घटना ताज्या असतानाच नाशिकच्या देवळाली गाव येथे जुन्या वादातून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज शुक्रवारी पहाटे घडली या घटनेननंतर परिसरात खळबळ उडाली आहे. (Nashik Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


‎मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल माळवे (वय ३६, रा. सुवर्ण सोसायटी, खोले मळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून आज शुक्रवारी पहाटे विशाल माळवे (Vishal Malve) याचा खून करण्यात आला. मयत विशाल माळवे आणि त्याचा मित्र अमोल गायकवाड रात्री एकत्र पार्टी करीत होते मात्र या दरम्यान दोघांमध्ये जुन्या वादातून वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत होऊन झाले आणि संशयित अमोल गायकवाड याने धारदार हत्याराने विशाल माळवे याच्यावर वार केले. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालचा मृत्यू झाला. (Nashik Crime News)



‎घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. तर संशयित अमोल गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान खुनाची घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले याबाबत पुढील तपास उपनगर पोलिस करीत आहेत. (Nashik Crime News)


‎मात्र एकामागोमाग शहरात घडत असलेल्या खुनाच्या घटनेने नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिकच्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय का ? हा प्रश्न आता निर्मांण झाला आहे.



घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट


दरम्यान, नाशिक शहरातील पेठरोडवरील मेहेरधाम, शिवतेजनगर येथील ‘बालाजी रो-हाउस’मध्ये गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गॅस गळतीमुळे घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत घरात आग लागून सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. मात्र, घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, तसेच घरातील दुसरे भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेनं परिसरात काही काळ भीतीचेवातावरण निर्माण झाले होते

Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम