Nashik TCS Case : निदा खानसह दोघांच्या जामीन अर्जावर आता 'या' दिवशी होणार निर्णय

Nashik TCS Case : नाशिक येथील बहुचर्चित टीसीएस आयटी कंपनीतील (Nashik TCS Case) कथित लैंगिक छळ, अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खान (Nida Khan) हिच्यासह अन्य दोन संशयितांच्या जामीन अर्जावर न्यायालय आता मंगळवारी ३० जून रोजी निर्णय देणार आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात (Deolali Camp Police Station) गुन्हा दाखल असून, संशयित निदा खानसह (Nida Khan) आठ जण सध्या न्यायालयीन कोठडीत नाशिक मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) आहेत. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



जामीन अर्जावर ३० जून रोजी निर्णय होणार


संशयितांच्या वतीने ज्येष्ठ वकील राहुल कासलीवाल यांनी मागील सुनावणीवेळी निदा खान तसेच शफी शेख आणि तौफीक खान यांच्या जामिनासाठी नाशिकरोड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती केदार जोशी यांच्याकडे बाजू मांडली होती. संशयितांना जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली होती.


मात्र, या जामीन अर्जाला विशेष सरकारी वकील अजय मिसर (Public Prosecutor Ajay Misar) यांनी जोरदार विरोध केला. प्रकरणाचे गांभीर्य, तपासाची स्थिती आणि उपलब्ध पुरावे यांचा विचार करून जामीन देऊ नये, अशी भूमिका सरकारी पक्षाने न्यायालयासमोर मांडली.दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाकडून २५ जून रोजी निर्णय अपेक्षित होता. मात्र, आता हा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून, निदा खानसह दोघांच्या जामीन अर्जावर (Bail application) न्यायालय मंगळवार, दि. ३० जून रोजी आपला निर्णय सुनावणार आहे.



निदा खानची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश


दरम्यान, या प्रकरणातील संशयितांकडून वकील बदलण्याची प्रक्रिया सुरूच असून, निदा खान (Nida Khan)  हिने आता ॲड. प्रतीक ताजनपुरे (Adv. Pratik Tajanpure) यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी संशयित दानिश शेख (Danish Shaikh) यानेही आपला वकील बदलला होता.ॲड. प्रतीक ताजनपुरे यांनी न्यायालयात बाजू मांडताना निदा खान ही गर्भवती असून तिच्या शरीरात लोहाची कमतरता असल्याचे सांगितले. त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. या मागणीची दखल घेत न्यायालयाने पोलिस यंत्रणा तसेच मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला निदा खान हिची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून