Nashik TCS Case : नाशिक येथील बहुचर्चित टीसीएस आयटी कंपनीतील (Nashik TCS Case) कथित लैंगिक छळ, अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खान (Nida Khan) हिच्यासह अन्य दोन संशयितांच्या जामीन अर्जावर न्यायालय आता मंगळवारी ३० जून रोजी निर्णय देणार आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात (Deolali Camp Police Station) गुन्हा दाखल असून, संशयित निदा खानसह (Nida Khan) आठ जण सध्या न्यायालयीन कोठडीत नाशिक मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) आहेत. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nashik Crime News : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तपोवन (Tapovan) येथे सुटकेसमधील आढळलेला महिलेचा ...
जामीन अर्जावर ३० जून रोजी निर्णय होणार
संशयितांच्या वतीने ज्येष्ठ वकील राहुल कासलीवाल यांनी मागील सुनावणीवेळी निदा खान तसेच शफी शेख आणि तौफीक खान यांच्या जामिनासाठी नाशिकरोड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती केदार जोशी यांच्याकडे बाजू मांडली होती. संशयितांना जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली होती.
मात्र, या जामीन अर्जाला विशेष सरकारी वकील अजय मिसर (Public Prosecutor Ajay Misar) यांनी जोरदार विरोध केला. प्रकरणाचे गांभीर्य, तपासाची स्थिती आणि उपलब्ध पुरावे यांचा विचार करून जामीन देऊ नये, अशी भूमिका सरकारी पक्षाने न्यायालयासमोर मांडली.दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाकडून २५ जून रोजी निर्णय अपेक्षित होता. मात्र, आता हा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून, निदा खानसह दोघांच्या जामीन अर्जावर (Bail application) न्यायालय मंगळवार, दि. ३० जून रोजी आपला निर्णय सुनावणार आहे.
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी अत्यंत कठोर आणि धक्कादायक पवित्रा ...
निदा खानची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश
दरम्यान, या प्रकरणातील संशयितांकडून वकील बदलण्याची प्रक्रिया सुरूच असून, निदा खान (Nida Khan) हिने आता ॲड. प्रतीक ताजनपुरे (Adv. Pratik Tajanpure) यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी संशयित दानिश शेख (Danish Shaikh) यानेही आपला वकील बदलला होता.ॲड. प्रतीक ताजनपुरे यांनी न्यायालयात बाजू मांडताना निदा खान ही गर्भवती असून तिच्या शरीरात लोहाची कमतरता असल्याचे सांगितले. त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. या मागणीची दखल घेत न्यायालयाने पोलिस यंत्रणा तसेच मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला निदा खान हिची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.






