Vaibhav Sooryvanshi : आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास ! रोहित- हार्दिकचा विक्रम मोडणार ?

Mumbai: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज (२६ जून) पासून दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना आयर्लंडच्या बेलफास्ट स्टॉर्मोंट स्टेडियम (Belfast Stormont Stadium) येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेपूर्वी चर्चा वैभवची होत आहे. विशेष म्हणजे, भारताच्या इतिहासात वैभव १५ व्या वर्षी पदार्पण करणार पहिला खेळाडू ठरू शकतो. बेवफास्टमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्यात जर त्याला खेळण्याची संधी मिळाली, तर तो पहिल्याच आंतराष्ट्रीय सामन्यात रोहित आणि हार्दिकचा विक्रम मोडीत काढू शकतो.





रोहित आणि हार्दिकचे विक्रम धोक्यात


वैभव सध्या तुफानी फॉर्ममध्ये आहे. यामुळे त्याच्याकडे रोहित आणि हार्दिकचे काही विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. टी-२० च्या एका सामन्यात सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करण्याचा विक्रम हार्दिकच्या (Hardik Pandya) नावावर आहे. हार्दिकने आयर्लंडच्या विरुद्ध एका सामन्यात केवळ ९ चेंडूत चार षटकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या होत्या,तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट ३५५ होता. वैभवने अनेकदा टी-२० मध्ये ४०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.दोन्ही देशांमधील सामन्यांत सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करण्याचा विक्रम सध्या हार्दिकच्या नावावर आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध आतापर्यंत पाच टी-२० सामन्यात २४१ च्या स्ट्राईक रेटने ७५ धावा केल्या आहेत.हा विक्रमही वैभव आजच्या सामन्यात मोडून काढू शकतो.


केवळ हार्दिक नाही तर, रोहितचा (Rohit Sharma) विक्रमही धोक्यात आहे. भारतासाठी आयर्लंडविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, त्याने 4 सामन्यांत 9 षटकार मारले आहेत. वैभव सूर्यवंशीकडे (Vaibhav Sooryvanshi ) हा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. कारण वैभवने नुकताच इंडियासाठी खेळताना एका सामन्यात १० षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. यामुळे या सामन्यात वैभव कोणते-कोणते विक्रम मोडीत काढतो याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.





संभाव्य प्लेइंग-11


भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा.


आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस एडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक/कर्णधार), गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फ्रीज, रुबेन विल्सन आणि गेविन होए.

Comments
Add Comment

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने जर्सीवर टेप लावून तो नंबर का लपवला? चाहतेही चक्रावले, उलटसुलट चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५