Nashik : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याचे २९ला होणार प्रस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आषाढी एकादशी पायी वारी

Nashik : विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढी एकादशी पायी वारी पालखी सोहळ्याचे येत्या सोमवारी (दि. २९) श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. वारी सोहळ्यासाठी अवघी त्र्यंबक नगरी सज्ज झाली असून, लाखो वारकरी या आनंदवारीच्या भक्तिरसात चिंब होण्यासाठी आतुर झाले आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू आणि वडील बंधू असलेल्या निवृत्तीनाथदादांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. समस्त संत मांदियाळींनी त्यात मोठी वृद्धी केली.



२८ दिवसांचा सोहळा


निवृत्तीनाथदादांनी मुहूर्तमेढ केलेला वारकरी संप्रदाय अवघ्या भारतवर्षात आहे. दर आषाढी एकादशीला निवृत्तीनाथदादांचा पायी वारी पालखी सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून बा विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतो. या पायी वारी सोहळ्याला प्राचीन अखंडित अशी उज्ज्वल परंपरा आहे. हजारो वारकरी, वीणेकरी, टाळकरी, भालदार, चोपदार, भजनी मंडळ, कीर्तनकार, तुळशीधारी महिला, मानकरी आणि शेकडो दिंड्यासह हा पायी वारी सोहळा प्रस्थान करतो. दि. २९ जून ते २५ जुलै असा हा २८ दिवसांचा सोहळा चालणार आहे.


त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झालेला हा पालखी सोहळा महानिर्वाणी आखाडा पेगलवाडी, सातपूर, गणेशवाडी पंचवटी, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर बु., राहुरी, डोंगरगण, अहिल्यानगर, अहिल्यानगर, साकत, घोगरगाव, मिरजगव, कर्जत, कोरेगाव, रावगाव, कंदर, दगडी अकोले, करकंब, चिंचोली (श्री चंद्रभागा स्नान) आणि शेवटी श्रीक्षेत्र पंढरपूर याप्रमाणे हा पालखी सोहळा पायी प्रवास करीत पांडुरंगाच्या चरणांचे दर्शन घेऊन पुलकित होतो.



पालखी सोहळ्याचे २९ जूनला होणार प्रस्थान


गेल्या सात आठ वर्षांपासून निवृत्तीनाथदादांची पालखी संपूर्ण चांदीच्या पत्र्याने बनविलेल्या रथात विराजमान केली जाते. या रथाला मानाची बैलजोडी जुंपत हा रथ ओढला जातो. रथाच्या सर्वात पुढे नगारा गाडी, त्यानंतर रथाच्या पुढे आणि मागे विणेकरी, टाळकरी, भजनी मंडळ, दिंड्या आणि हजारोंच्या संख्येने वारकरी निवृत्तीनाथांचा गजर करीत विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने चालत असतात. दि. २९ रोजी दुपारी २ वाजता हा सोहळा समाधी मंदिरापासून प्रस्थान करेल. यावेळी मंत्रिगण, लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार, विश्वस्त मंडळ, मानकरी, कीर्तनकार, भजनी मंडळ, महाराज, साधू-संत, विणेकरी, वारकरी आदींसह लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहणार आहे.


सर्वांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथदादांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन निवृत्तीनाथ समाधी मंदिर संस्थानचे अध्यक्ष हभप राहुल महाराज साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळाप्रमुख मनोजकुमार राठी विश्वस्त नारायण मुठाळ, प्रा. अमर ठोंबरे, कांचन जगताप, नीलेश गाढवे, अड. सोमनाथ घोटेकर, गोकुळ गांगुर्डे, भानुदास गोसावी, जयंत गोसावी, योगेश गोसावी आणि त्र्यंबकेश्वरचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले आहे.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे